गोव्याच्या कस्टम अधिकाऱ्याची भूमीका साकारणार नवाजुद्दीन.. लवकरच शूटींग सुरु

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच एका नव्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.
Nawazuddin Siddiqui in Upcoming Biopic
Nawazuddin Siddiqui in Upcoming BiopicDainik Gomantak
Published on
Updated on

Nawazuddin Siddiqui in Upcoming Biopic : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा एक वास्तववादी अभिनेता म्हणून ओळखला जातो. आजवरच्या करिअरमध्ये नवाजने अनेक अप्रतिम भूमीका साकारलेल्या आहेत.

आपल्या चित्रपटांमधून नवाजने अनेक विलक्षण पात्रांचा जिवंत अनुभव दिला आहे. ठाकरे चित्रपटातील बाळासाहेब ठाकरेंची भूमीका असो की उर्दू साहित्यिक सादत हसन मंटोची भूमीका असो नवाजने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना जिंकले आहे.

आणखी एक बायोपिक

ठाकरे सिनेमानंतर नवाजुद्दीन आणखी एक बायोपीकमध्ये भुमिका साकारणार आहे. हा बायोपीक दिवंगत रिअल लाइफ कस्टम ऑफिसर कोस्टा फर्नांडिस यांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीनला साइन करण्यात आले आहे.

सेजल शाह या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. कोस्टा फर्नांडिस यांनी 1990 च्या दशकात गोव्यात सोन्याच्या तस्करीच्या विरोधात लढा दिला होता.

कोस्टा फर्नांडिसची भूमीका

अमर उजालाच्या वृत्तानुसार, नवाजुद्दीन कोस्टा फर्नांडिस यांच्या बायोपिकमध्ये स्मगलर्सविरुद्ध लढताना दिसणार आहे. 'सिरीयस मॅन'ची निर्मिती करणाऱ्या सेजल शाहने हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत.

गोव्यात शूटींगला सुरुवात

आता लवकरच गोव्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल. या सिनेमात कोस्टा फर्नांडिसच्या आयुष्यात घडलेल्या रोमांचक आणि नाट्यमय घटना दाखवल्या जाणार आहेत

कस्टम अधिकारी

कस्टम अधिकारी कोस्टा फर्नांडिज यांचे वर्णन एक 'दुर्मिळ नायक' म्हणून केले जाते. कोस्टा फर्नांडीज यांनी अनेक जीवावर बेतलेल्या अनेक घटनांचा सामना केलाय. याशिवाय गुन्हेगार आणि तस्करांसोबत झालेल्या चकमकींमुळे त्यांना लक्षात ठेवले जाते

Nawazuddin Siddiqui in Upcoming Biopic
Bigg Boss : बिग बॉसमधली भांडणं काही थांबेनात.. आता मनारा चोप्रासोबत भिडली अंकिता लोखंडे

कोस्टा एक प्रामाणिक अधिकारी

त्यांनी जीव धोक्यात घालून तस्करीचे अनेक प्रयत्न थांबवले. कोस्टा फर्नांडिस हे गोवा कस्टम्समध्ये 1979 मध्ये प्रतिबंधात्मक अधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यांच्या आयुष्यावर आधारीत येणारा हा सिनेमा नक्कीच रंजक असेल.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com