मम्मी ने डरना नहीं सिखाया! होमवर्क न केलेल्या चिमुकल्याची शिक्षिकेवरच दादागिरी, पाहा Viral Video

Childrens Viral Video: इतकंच नाही तर शेवटच्या ठोक्यामध्ये मुलाने खरा धमाका केला, शिक्षिका जेव्हा मुलावर ओरडली तेव्हा तो म्हणाला, 'माझ्या आईने मला शिकवलं आहे की कोणाला घाबरायचे नाही.'
Viral Video
Viral VideoInstagram, @public_memes_club

Mummy Ne Darna Nahi Sikhaya! A child who did not do homework bullied the teacher, see Viral Video:

लहान मुलांचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेतात. काही भोळी मुलं त्यांच्या गोड शैलीत गाणी गाऊन तर काही गोंडस नृत्य करून मन जिंकतात. पण नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एका निरागस मुलाने रडत रडत आपल्या गोंडसपणाची सर्वांना खात्री पटवून दिली. त्याचा निरागसपणा आणि प्रेमळ भाषा पाहणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या बालपणीची आठवण आल्याशिवाय राहिले नसेल. सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळू लागली आहे.

@public_memes_club नावाच्या अकाऊंटवरुन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये एक मुलगा शिक्षिकेलाचा धडे देत आहे. मात्र, व्हिडिओच्या सुरुवातील फक्त शिक्षिकेचाच आवाज ऐकू येतो आणि समोरच मूल बसलेले दिसते.

या मुलाचा गृहपाठ नीट न केल्यामुळे शिक्षिकेने रागावले तेव्हा त्या मुलाने त्याच्या आईला यासाठी जबाबदार धरले. रडत रडत मुल निरागस आवाजात म्हणते, 'मम्मीने मला सारखे सारखे लिहायला लावून वेड लावले आहे'.

Viral Video
Income Tax Slab मध्ये कोणताही बदल नाहीत, तरीही एक कोटी करदात्यांना कसा होणार फायदा? जाणून घ्या

इतकंच नाही तर जेव्हा शिक्षिका मुलाला चूक सुधारून पुन्हा लिहायला सांगतात तेव्हा मुलाने शिक्षकिला नकार देत मला तुमच्याकडून शिकायचे नाही असं म्हटलं. इतकंच नाही तर शेवटच्या ठोक्यामध्ये मुलाने खरा धमाका केला, शिक्षिका जेव्हा मुलावर ओरडली तेव्हा तो म्हणाला, 'माझ्या आईने मला शिकवलं आहे की कोणाला घाबरायचे नाही.'

Viral Video
CBSE नववीतील मुलं गिरवतायेत 'डेटिंग-रिलेशनशिप'चे धडे; धड्याचे फोटो व्हायरल

आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि उत्स्फूर्तपणे आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'माझ्या आईने मला कोणाला घाबरू नका असे शिकवले' आणि एक इमोजी देखील वापरतो.

निरागस मुलाच्या या गोंडस कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा आतापर्यंत व्हिडिओ 22.5 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे आणि अनेक लोकांनी कमेंट केल्या आहेत.

कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, तुम्ही मुलांशी ज्या पद्धतीने बोलता, तेही तसेच बोलतील, मूल खूप गोंडस आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com