SpiceJet flight dainik gomantak
देश

मोठा अनर्थ टळला : दिल्लीहून श्रीनगरला जाणारे स्पाइसजेटचे विमान विजेच्या खांबाला धडकले

दिल्लीहून श्रीनगरला जाणारे विमान पुशबॅक करताना विजेच्या खांबाला धडकले

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : सोमवारी सकाळी दिल्ली विमानतळावर प्रवाशांनी भरलेले विमान पुशबॅक करताना विजेच्या खांबाला धडकल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, सुदैवाने मोठी दुर्घटना घडली टळली असून प्रवाशी बालबाल बचावले. (A SpiceJet flight collided with an electric pole at the Delhi airport during pushback)

मिळालेल्या माहितीनुसार, स्पाइसजेटचे विमान दिल्लीहून (Delhi) प्रवाशांना (Passengers) घेऊन श्रीनगरला (Shrinagar) जात होते. यावेळी सकाळी ९.२६ वाजता हा अपघात झाला. पुशबॅक दरम्यान, विमान प्रवासी टर्मिनलवरून धावपट्टीकडे जात असताना विजेच्या (Electricity) खांबाला धडकले.

यावेळी विमानात प्रवासी होते, मात्र त्यांचे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. या घटनेची माहिती मिळताच स्पाइसजेटने (SpiceJet) विमान बदलले आणि त्यानंतर ते उड्डाण केले. DGCAकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्पाइसजेटच्या बोईंग 737-800 चा उजवा विंग विजेच्या खांबाला धडकला आणि त्याचे नुकसान झाले.

स्पाइसजेटने एक निवेदन केले जारी

या घटनेनंतर, स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने कंपनीच्या वतीने एक निवेदन जारी केले की, त्यात 28 मार्च रोजी स्पाईसजेटचे फ्लाईट एसजी 160 दिल्लीहून जम्मूला जाणार होते. पुश बॅक करताना विमानाचा (SpiceJet flight) उजवा पंख खांबाला आदळल्याने आयलरॉनचे नुकसान झाले. त्यामुळे सेवा सुरळीत ठेवण्यासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT