लवकरच कोरोना कॉलर ट्यूनपासून मिळणार मुक्ती

दूरसंचार विभागाचे कोरोना कॉलर ट्यून बंद करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाला पत्र
caller tune
caller tunedainik gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली : देसातील नागरिकांना कोरोनाने जीतके हैराण झाले नसलतील तितके ते कोरोनाच्या कॉलर ट्यूनने हैराण झाले होते. आता देशातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण गेल्या दोन वर्षांपासून सुरू असणारी कोरोना कॉलर ट्यूनपासून मुक्ती मिळणार आहे. दूरसंचार विभागाने (DoT) कोरोना कॉलर ट्यून बंद करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. (caller tune on coronavirus is going to stop soon)

कोणालाही एखाद्याला फोन करायाचा असल्यास त्याआधी कोरोनाची (Corona) कॉलर ट्यून ऐकावी लागत आहे. लोकांनी या कोरोना कॉलर ट्यूनबद्दल (Caller Tune) अनेक वेळा तक्रार केली आहे की, ती खूप त्रासदायक आहे. साथीच्या रोगाविरुद्ध जनजागृती करण्यासाठी कोरोना कॉलर ट्यून सुरू करण्यात आली होती. पण त्यानंतर लसीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे.

अनेकवेळा तातडीच्या किंवा आपत्कालीन कॉलच्या वेळी, या कॉलर ट्यूनमुळे, कॉल कनेक्ट होण्यास उशीर होतो, ज्यामुळे लोकांना खूप त्रास होत आहे. जरी कोरोना कॉलर ट्यून सुरू होण्याबरोबरच 1 दाबल्याने ही ट्यून अनेक वेळा थांबते. आता दूरसंचार विभागाने आरोग्य मंत्रालय तसेच सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया (COAI) यांना कॉलर ट्यून काढून टाकण्याची विनंती केली आहे. एका अहवालानुसार, आरोग्य मंत्रालय (Ministry of Health) विभागाच्या विनंतीनंतर कॉलर ट्यून काढून टाकण्याचा विचार करत आहे.

caller tune
RBI Recruitment 2022 : रिझर्व्ह बँकेत 'या' पदांसाठी निघाली भरती

DoT ने आरोग्य मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की प्री-कॉलर ट्यून चालू ठेवणे म्हणजे आपत्कालीन परिस्थितीसाठी केले जाणारे महत्त्वाचे कॉल थांबवणे आणि विलंब करणे. यामुळे दूरसंचार सेवा प्रदाते (TSP) मोबाइल नेटवर्क कॉल कनेक्शनमध्ये खूप विलंब करतात. आता त्यात बदल करून कॉलर ट्यून काढून टाकण्याची वेळ आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com