Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
देश

अल्प प्रमाणात ड्रग्ज बाळगता येणार ? मोदी सरकार आणणार विधेयक

आता मोदी सरकार (Modi government) संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एक विधेयक आणत आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात (Maharashtra) मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्या मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात बॉलिवूड (Bollywood) किंग खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अटक करण्यात आली होती. यानंतर आता मोदी सरकार (Modi government) संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एक विधेयक आणत आहे. विशेष म्हणजे हे विधेयक मंजूरही करण्यात आले आहे. त्यामुळे आता अल्प प्रमाणात ड्रग्ज बाळगणे गुन्हा मानण्यात येणार नसल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, आर्यन खान प्रकरणानंतर यासंदर्भात मागणी करण्यात येत असल्याचे सांगितले जात होते. 10 नोव्हेंबरला पंतप्रधान कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये या प्रकरणातील शिफारशींवर निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान या बैठकीला महसूल विभाग, गृह विभाग, नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो, सामाजिक न्याय मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित असल्याचे सांगितले आहे. नार्कोटिक्स ड्रग्ज सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस विधेयक 2021 अंतर्गत, अमली पदार्थांचे सेवन या गुन्ह्याच्या कक्षेतून बाहेर ठेवण्यात आले असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. यासाठी 1985 च्या कायद्यातील कलम 15, 17, 18, 20, 21 आणि 22 मध्ये सुधारणा करण्यात येतील असे देखील सांगितले जात आहे.

विक्री हा गुन्हा मानण्यात येणार

एखाद्या व्यक्तीने ड्रग्ज बाळगणे, खाजगीरित्या सेवन करणे आणि विक्री करणे यात नार्को विधेयकानुसार कोणताही फरक करण्यात येणार नाही. यामध्ये मात्र विक्री करणे गुन्हा मानला जाईल, परंतु अत्यंत कमी प्रमाणात ड्रग्ज बाळगणे आणि वैयक्तिक वापर करणे हे गुन्ह्याच्या कक्षेमधून बाहेर काढण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आर्यन खान प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्र्यांपासून ते सेलिब्रिटींनी कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी केली होती. अशा प्रकरणात अडकलेल्या लोकांना एकदा सुधारण्याची संधी मिळायला हवी असे म्हटले होते. भारत सरकार संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कृषीविषयक कायदे मागे घेण्यासह 26 विधेयके मांडणार आहे. मागील आठवड्यामध्ये पंतप्रधानांनी कृषीविषयक कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता यासाठी संसदेत विधेयक सादर करण्यात येईल असे सांगण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT