A Sessions Court In Mumbai Sets Aside Order Of Maintenance After Knowing That Wife Earn More Than Husband.
A Sessions Court In Mumbai Sets Aside Order Of Maintenance After Knowing That Wife Earn More Than Husband. Dainik Gomantak
देश

वर्षाला 90 लाख कमावणाऱ्या महिलेला कोर्टाचा दणका; पोटगीचा आदेश रद्द

Ashutosh Masgaunde

A Sessions Court In Mumbai Sets Aside Order Of Maintenance After Knowing That Wife Earn More Than Husband:

पत्नीची कमाई पतीपेक्षा जास्त असल्याने मुंबई सत्र न्यायालयाने नुकतेच एका न्यायदंडाधिकार्‍याने पतीने पत्नीला दरमहा 10 हजार रुपये पोटगी देण्याचा अंतरिम आदेश रद्द केला.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.बी. पवार यांनी निरीक्षण नोंदवले की, पोटगी मंजूर करण्याचा उद्देश विवाहाच्या अपयशामुळे अवलंबून असणारा जोडीदार निराधार होणार नाही यासाठी आहे.

पोटगीच्या रकमेवर निर्णय घेण्यासाठी संबंधित घटकांमध्ये पत्नीच्या वाजवी गरजा, तिच्याकडे स्वतंत्र उत्पन्नाचा स्रोत आहे की नाही, पतीची आर्थिक क्षमता आहे की नाही याची खात्री करणे गरजेचे असते.

मात्र, सध्याच्या प्रकरणात पत्नी आणि पतीने कमावलेल्या उत्पन्नातील तफावत मोठी असून पत्नीने पतीपेक्षा अधिक कमाई केली असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.

सध्याच्या प्रकरणात, पती आणि पत्नीच्या उत्पन्नामध्ये खूप तफावत आहे. पत्नीने 2020-21 मध्ये व्यवसायातून 89 लाख रुपये कमावले आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी पतीचे वार्षिक उत्पन्न सुमारे साडेतीन लाख रुपये आहे. आणि तेही पत्नीच्या व्यवसायातून मिळणारा पगार आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.बी. पवार

न्यायाधीश पवार यांनी असे मत मांडले की न्यायदंडाधिकारी यांनी पोटगीचा आदेश देताना पत्नीच्या आर्थिक स्थितीचा विचार केला नाही.

“दंडाधिकार्‍यांनी अंतरिम पोटगी मंजूर केली जी माझ्या मते कायद्याच्या तत्त्वांनुसार नाही. हा आदेश न्याय्य, कायदेशीर आणि वाजवी नसल्याच्या निष्कर्षावर मी आलो आहे,” असे सत्र न्यायाधीश पवार म्हणाले.

या प्रकरणात पत्नीने पतीवर घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत खटला दाखल केला होता. याला पतीने आव्हान दिले होते.

यामध्ये पत्नीने असा आरोप केला होता की, पती सातत्याने मानसिक त्रास देतो. जेव्हा तिने पतीला घटस्फोट मागितला होता तेव्हा पतीने 4 कोटी रुपयांची मागणी केली होती असा आरोपही पत्नीने केला होता.

पतीने हे आरोप फेटाळून लावले आणि उलट आरोप केला की त्याच्या पत्नीचे बाहेर अनेक संबंध होते.

डिसेंबरमध्ये, दंडाधिकारी न्यायालयाने तिला अंतरिम पोटगी मंजूर केली. त्यामुळे संतप्त झालेल्या पतीने सत्र न्यायालयात अपील केले.

पत्नी आर्थिकदृष्ट्या सुदृढ आहे आणि स्वत:ला उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेसे स्वतंत्र उत्पन्न आहे असे आढळून आल्याने सत्र न्यायालयाने हा आदेश बाजूला ठेवला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

SCROLL FOR NEXT