MP Shafiqur Rahman Barq Dainik Gomantak
देश

''तीन मिनिटांच्या अजानने त्रास होत असेल तर...''

समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क़ (MP Shafiqur Rahman Barq) यांनी मशिदींमध्ये होणाऱ्या अजानबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

दैनिक गोमन्तक

लाऊडस्पीकरवरील अजान वादावरुन महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटकात पुन्हा एकदा वाद सुरु झाला आहे. त्याचवेळी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेले समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क़ यांनी मशिदींमध्ये होणाऱ्या अजानबाबत मोठे वक्तव्य केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, ''अजानबाबत वाद निर्माण करणे हे देशात द्वेष पसरवण्याचे षडयंत्र आहे. तीन मिनिटांच्या अजानमुळे ध्वनी प्रदूषण होत नाही, मात्र रात्रभर लाऊडस्पीकरवर जे अखंड पाठाचे पठन केले जाते, त्यावर मात्र कोणी बोलत नाही.''

काही लोकांना देशात द्वेषाचं राजकारण करायचयं

समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) खासदार शफीकुर्रहमान बर्क़ (MP Shafiqur Rahman Barq) हे अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यावेळीही त्यांनी अजान वादाचे निमित्त करुन एकपात्री मजकुरावर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, ''यावेळी अशाप्रकारचे मुद्दे उपस्थित करुन काही लोकांना देशात द्वेष पसरवायचा आहे. मुस्लिम समाजाला केवळ नि केवळ त्रास दिला जात आहे. अजान फक्त तीन-चार मिनिटांसाठी असते. आता एवढ्या कालावधीत ध्वनी प्रदूषण कसे होणार? चोवीस तास चालणाऱ्या अखंड पठनावर कुणी काही बोलत नाही.''

भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे

खासदार शफीकुर रहमान बरक म्हणाले की, ''आपली भारतीय संस्कृती युरोपीयनपेक्षा खूपच चांगली आहे. पूर्वी महिला बुरखा घालत असत. पण आता हळूहळू सगळं बदललं.'' एवढा मोकळेपणा आपल्या धर्मात हराम असल्याचे खासदार म्हणाले. महिलांसाठी हिजाब अनिवार्य आहे. आपल्या संस्कृतीला युरोपियन संस्कृतीशी जोडले जात असल्याचे खासदार म्हणाले.

महाराष्ट्रातून वाद सुरु झाला

वास्तविक, मशिदींतील लाऊडस्पीकरवरुन महाराष्ट्रातून सुरु झालेला वाद कर्नाटकात पोहोचला आणि आता हळूहळू देशाच्या इतर भागातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. कर्नाटकात मशिदींमध्ये आवाजाचे मापन करणारी यंत्रे बसवली जात आहेत. त्याचबरोबर सुमारे 250 मशिदींना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात मशिदींमधून लाऊडस्पीकर न हटवल्यास हनुमान चालिसाचा पाठ करण्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला होता. दुसरीकडे, आज एका निवेदनात खासदार संजय राऊत म्हणाले की, ''महाराष्ट्र सरकारनेही नोटीस बजावून आवाजाचा डेसिमल किती असावा यासंबंधी निर्देश दिले आहेत.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT