आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे. आता मुख्यमंत्री जगन रेड्डी नव्याने मंत्रिमंडळ स्थापन करणार आहेत. मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पहिल्या टप्प्यात 24 मंत्र्यांनी राजीनामे सादर केले आहेत. मंत्रिमंडळात जगन रेड्डी हे एकमेव मुख्यमंत्री राहिले आहेत.
दरम्यान, मंत्रिमंडळात बदल होणारच होते, कारण मुख्यमंत्र्यांनी अर्धा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर मंत्रिमंडळ बदलणार असल्याचे यापूर्वीचं सांगण्यात आलं होतं. हा बदल डिसेंबर 2021 मध्ये होणार होता, परंतु कोरोना (Corona) संकटामुळे तो पुढे ढकलावा लागला होता. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी संध्याकाळी राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांची भेट घेऊन मंत्रिमंडळातील बदलांची माहिती दिली.
कोरोनामुळे मंत्रिमंडळ पुनर्रचना होऊ शकली नाही
विद्यमान मंत्रिमंडळाने 8 जून 2019 रोजी शपथ घेतली होती. या कारणास्तव, ते 8 डिसेंबर 2021 पर्यंत या पदावर राहणार होते, परंतु कोरोना महामारीमुळे मंत्रिमंडळ पुनर्रचनेचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांना सांगण्यात आले की, आम्ही उगादी (April 2 is Telugu New Year's Day) दिनी मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. तेलुगू नववर्ष दिनानिमित्त 13 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली आहे. नवीन जिल्ह्यांच्या समावेशानंतर आता राज्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या 26 झाली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.