आंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डी सरकारने स्थापन केले आणखी 13 जिल्हे

आंध्र प्रदेशमध्ये सोमवारी 13 नवीन जिल्हे निर्माण करण्यात आले आहेत, त्यानंतर राज्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या 26 वर गेली आहे.
Jagan Mohan Reddy News, 13 new districts in Andhra Pradesh News
Jagan Mohan Reddy News, 13 new districts in Andhra Pradesh NewsDainik Gomantak

आंध्र प्रदेशमध्ये सोमवारी 13 नवीन जिल्हे निर्माण करण्यात आले आहेत, त्यानंतर राज्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या 26 वर गेली आहे. मुख्यमंत्री वाईएस जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांनी गुंटूर जिल्ह्यातील ताडेपल्ली येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 13 नवीन जिल्ह्यांची घोषणा केली आहे. सीएम रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस सरकारने नव्याने निर्माण झालेल्या जिल्ह्यांमध्ये आयएएस, आयपीएस अधिकारी, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांची देखील नियुक्ती केली आहे. राज्य सरकारने (State Government) जानेवारीमध्ये विद्यमान 13 पैकी 26 जिल्ह्यांची निर्मिती करण्यासाठी मसुदा अधिसूचना जारी केली गेली होती आणि सूचना तसेच हरकती देखील मागवण्यात आल्या होत्या. (In Andhra Pradesh the Jagan Mohan Reddy government established 13 more districts)

Jagan Mohan Reddy News, 13 new districts in Andhra Pradesh News
दिल्लीत 12 तासांत दुसऱ्यांदा CNG च्या दरात वाढ

आंध्र प्रदेश सरकारला लोकांकडून 16,600 सूचना आणि हरकती मिळाल्या होत्या आणि त्यांचा फेर विचार करण्यात आला होता. लोकप्रतिनिधींशी चर्चा करून अधिकाऱ्यांनी शिफारशी केल्या होत्या. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रेड्डी यांनी वचन दिले होते की त्यांचा पक्ष सत्तेत आल्यास प्रत्येक लोकसभा मतदारसंघ एक जिल्हा बनवेल, तर राज्यात लोकसभेच्या 25 जागा आहेत. पूर्व गोदावरी आणि विशाखापट्टणममधील आदिवासी भाग कोरून एक जिल्हा देखील तयार करण्यात आला होता. (13 new districts in Andhra Pradesh News)

एका निवेदनात सरकारने असे म्हटले की, "लहान जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे, जिल्हा केंद्रापासून दुर्गम आणि सीमावर्ती गावांपर्यंतचे अंतर कमी होईल. सरकार लोकांच्या जवळ आल्याने जिल्हा प्रशासन जनतेच्या जवळ येऊ शकते आणि जबाबदारीही वाढू शकते. जिल्हा पोलिस अधिकारी आणि त्यांचे कॅम्प ऑफिससह इतर सर्व सरकारी विभाग एकाच आवारात असतील, त्यामुळे सर्व सरकारी कार्यालयांमध्ये कामासाठी मैलभर प्रवास करणाऱ्या लोकांचा त्रास देखील दूर होईल.

Jagan Mohan Reddy News, 13 new districts in Andhra Pradesh News
13 वर्षीय मुलाने केली 8 वर्षाच्या मुलाची हत्या

1. मन्यम जिल्हा विजयनगरम जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला.

2. अनकापल्ली जिल्हा विशाखापट्टणम जिल्ह्यापासून बनवण्यात आला आहे.

3. काकीनाडा हे पूर्व गोदावरी जिल्ह्यातून कापून बनवण्यात आले आहे.

4. कोनसीमा पूर्व गोदावरी जिल्ह्यातून कापण्यात आले.

5. एलुरू पश्चिम गोदावरी जिल्ह्यापासून वेगळे झाले आहे.

6. पलनाडू गुंटूर जिल्ह्यापासून वेगळे करण्यात आले.

7. बापटला गुंटूर जिल्ह्यातून कापले गेले आहे.

8. नंद्याल हे कुर्नूल जिल्ह्यातून कापले गेले.

9. श्री सत्य साई जिल्हा अनंतपूर येथून निर्मित झाले आहे.

10. श्री बालाजी चित्तूर जिल्ह्यातून कापले गेले आहे.

11. अन्नमय कडप्पा जिल्ह्यापासून वेगळे झाले आहे.

12. एनटी रामाराव जिल्हा विद्यमान कृष्णा जिल्ह्यामधून तयार करण्यात आले आहे.

13. अल्लुरी सीताराम राजू हे विशाखापट्टणम जिल्ह्यात कापले गेले आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com