Crime Dainik Gomantak
देश

निर्दयी आईने एका दिवसाच्या मुलाला गाडले जमिनीत, 'रडण्याचा आवाज ऐकून...

शिवपुरीत (Shivpuri) एका मातेने जे केले ते अवघ्या मानवजातीला कंलकित करणारे ठरले आहे.

दैनिक गोमन्तक

शिवपुरीत एका मातेने (Mother) जे केले ते अवघ्या मानवजातीला कंलकित करणारे ठरले आहे. जन्मानंतर काही तासांतच एका नवजात अर्भकाला जमिनीत जिवंत गाडून मरण्यासाठी सोडल्याची घटना समोर आली आहे. परंतु नवजात बालकाचे नशीब चांगले होते, खड्डा फार खोल नव्हता. दरम्यान, एका शेतकऱ्याने त्याचा आरडाओरडा ऐकल्यानंतर तात्काळ वाचवले. (A Ruthless Mother Buried Her One Day Old Child In The Ground)

दरम्यान, हे प्रकरण शिवपुरी जिल्ह्यामधील पोहरी तालुक्यातील सर्जापूर गावचे आहे. एका निर्दयी मातेने एक दिवसाच्या नवजात अर्भकाला शेताजवळील खड्ड्यात जिवंत गाडून त्यावर दगड टाकले. त्या खड्ड्याजवळ कोणीही पोहोचू नये म्हणून तिने झाडाझुडपांनी झाकले होते. मात्र खड्डा फार खोल नव्हता. नवजात अर्भक ज्यावेळी रडायला लागले तेव्हा शेतात गुरे चारणाऱ्या एका शेतकऱ्याने त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकला. त्यानंतर त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून त्या दिशेने गेला. इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर शेतकऱ्याने खड्ड्यावरील दगड हटवून जमिनीत गाडलेल्या नवजात बाळ पाहून तो क्षणभर स्तब्ध झाला. यावेळी हे नवजात अर्भक जिवंत होते, त्यामुळे शेतकऱ्याने तात्काळ100 वर कॉल करुन नवजात बाळ सापडल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून बालकाला रुग्णालयात दाखल केले. मात्र नवजात अर्भकाच्या डोक्याला, गुडघ्याला आणि पंजाला दुखापत झाल्याने त्याला एसएनसीयू शिवपुरीमध्ये दाखल करण्यात आले.

बुधवारी सकाळी जन्म

नवजात बालकासंबंधी असे कृत्य करणाऱ्या आईचा पोलीस शोध घेत आहेत. मुलाचे वजन 2.155 किलो आहे. डॉक्टर त्याची काळजी घेत आहेत.

दरम्यान, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी सकाळी बाळाचा जन्म झाला असावा. ज्या शेतात हे अर्भक सापडले त्या जंगलाला लागून मोठा परिसर आहे. खड्डा खोल नसल्याने मुलाचा श्वासोच्छवास सुरुच राहीला आहे. त्यामुळे त्याला वाचविण्यात यश आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

SCROLL FOR NEXT