Monkey Viral Video Dainik Gomantak
देश

रेस्टॉरंटमध्ये अचानक घुसला 'छोटा' पाहुणा, कर्मचाऱ्याने प्रेमाने दिला नाश्ता; हृदयस्पर्शी Video Viral

Monkey Viral Video: सोशल मीडिया (Social Media) हे असे एक व्यासपीठ आहे जिथे कंटेटची (Content) कधीच कमी नसते.

Manish Jadhav

Monkey Viral Video: सोशल मीडिया हे असे एक व्यासपीठ आहे जिथे कंटेटची (Content) कधीच कमी नसते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक विविध प्रकारचे व्हिडिओ (Video) आणि फोटो (Photo) पोस्ट करत असतात. प्रत्येकजण आपल्यानुसार सर्वोत्तम किंवा सर्वात अनोखा व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर जर यूजर्संना ती पोस्ट अनोखी वाटली, तरच ती व्हायरल (Viral) होते. तुम्हीही तुमच्या फीडवर (Feed) अनेक व्हायरल व्हिडिओ आणि फोटो पाहिले असतील. सध्या असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

रेस्टॉरंटमध्ये घुसलेला 'बंदर' आणि कर्मचाऱ्याची माणुसकी

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सांगण्यासारखे फार काही नसले तरी, जे आहे ते निश्चितच वेगळे आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, एक माकड (Monkey) एका रेस्टॉरंटमध्ये (Restaurant) घुसले आहे. साधारणपणे, जेव्हा असे काही घडते, म्हणजे एखादा प्राणी कुठे घुसला की, लोक त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतात किंवा स्वतःच कुठे तरी लपून बसतात. मात्र, येथे वेगळेच घडले.

तिथल्या एका कर्मचाऱ्याने (Staff Member) त्या माकडाला खाण्यासाठी एका प्लेटमध्ये (Plate) काहीतरी दिले. माकड ते दिलेले अन्न खूपच आरामात बसून खाताना दिसत आहे. त्या कर्मचाऱ्याने त्या माकडाची गरज किंवा भूक ओळखली आणि त्याच्याशी माणुसकीने वागला. कर्मचाऱ्याच्या याच माणुसकीच्या वागणुकीमुळे हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर कौतुक आणि प्रतिक्रिया

हा व्हिडिओ 'एक्स' (X Platform) प्लॅटफॉर्मवर @gharkekalesh नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये (Caption) लिहिले आहे, "एक छोटा बंदर एका रेस्टॉरंटमध्ये घुसला आणि रेस्टॉरंटच्या स्टाफने खूपच प्रेमाने त्याला नाश्ता दिला." बातमी लिहेपर्यंत हा व्हिडिओ 19 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

व्हिडिओ पाहिल्यानंतर युझर्सनी विविध प्रकारच्या कमेंट्स (Comments) केल्या आहेत. एका युझरने गंमतीने लिहिले, "मोंकेश आणि डोगेश (Monkesh and Dogesh), दोघांनाही नाही म्हणायचे नाही, काय नाही म्हणायचे नाही." दुसऱ्याने लिहिले, "खूप छान, माकड खूपच चांगले आहे." तर तिसऱ्याने लिहिले, "वाह! काय ॲटिट्यूड (Attitude) आहे."

या व्हिडिओने सोशल मीडियावर (Social Media) अनेक लोकांची मने जिंकली आहेत आणि प्राण्यांप्रती दया भाव बाळगण्याचा संदेश दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cordelia Cruise: पश्चिम किनारपट्टीवरील सफरनामा! कोची ते गोवा करा 5 दिवसांची 'ओशन ड्रीम्स' सफर; कोर्डेलिया क्रूझचं नवं पॅकेज

Goa: वेटरकडून हॉटेलच्या मालकीणीवर बलात्कार, तोंडावर उशी ठेऊन दिली जीवे मारण्याची धमकी; आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Goa Schools: राज्यातील शाळांमध्ये आता 'वॉटर ब्रेक'! विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी मिळणार 2 मिनिटांचा वेळ; शिक्षण खात्याचा निर्णय

ED Goa: रोहन हरमलकरांचा पाय खोलात; जमीन हडप प्रकरणी ईडीने 212 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता केली जप्त

Goa Assembly: नोकऱ्या नसल्याने तरुणाई व्यसनांच्या विळख्यात... युरी आलेमाव यांचा गंभीर आरोप; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT