Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Robot Breakdance Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक रोबोट (Robot) ब्रेक डान्स (Break Dance) करताना दिसत आहे.
Robot Breakdance Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Robot Breakdance Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक रोबोट (Robot) ब्रेक डान्स (Break Dance) करताना दिसत आहे, पण अचानक तो तोल जाऊन पडतो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक रोबोटिक्सवरच (Robotics) प्रश्नचिन्ह उपस्थित करु लागले आहेत. ‘रोबोट खरोखरच माणसांसारख्या जटिल हालचाली करु शकतात का?’ असा सवाल लोक विचारत आहेत.

आधी हा व्हिडिओ पाहा!

डान्स करता-करता पडला रोबोट

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक रोबोट जॅकेट आणि टोपी घालून डान्स (Dance) करताना दिसतो. हा रोबोट अनेक आकर्षक डान्स स्टेप्स (Dance Steps) करतो, ज्या ब्रेक डान्ससारख्या दिसतात. मात्र, अचानक त्याची टोपी खाली पडते आणि तोल जाऊन तो जमिनीवर कोसळतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पडल्यानंतरही त्याचे हात-पाय काही सेकंद त्याच प्रकारे हालत राहतात, जणू त्याला ‘फेफरे’ आले असावे. काही वेळातच रोबोटच्या हालचाली थांबतात आणि कंपनीचे कर्मचारी त्याच्यापर्यंत पोहोचतात.

Robot Breakdance Video
‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

माणसांसारखं काम करणं रोबोट्ससाठी कठीण

मानवी शरीर (Human Body) शेकडो हालचाली करण्यास सक्षम आहे, जे 206 हाडे (Bones) आणि हजारो स्नायूंच्या (Muscles) जटिल समन्वयामुळे शक्य होते. परंतु रोबोटसाठी अशा हालचालींची नक्कल करणे सोपे नाही. या व्हिडिओमध्ये दाखवलेला प्रयोग कदाचित रोबोट किती प्रमाणात मानवी हालचालींची नक्कल करु शकतो, हे तपासण्यासाठीच असावा. मात्र, हा प्रयोग अयशस्वी ठरला, कारण रोबोटला संतुलन (Balance) राखता आले नाही.

व्हायरल व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ सोशल साईट 'एक्स'वर (@justinboldaji) @justinboldaji नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1.21 कोटी व्ह्यूज (Views), 67 हजार लाईक्स (Likes) आणि 1400 कमेंट्स (Comments) मिळाल्या आहेत. लोकांनी यावर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एका युझरने मस्करीत विचारले, “हे तूच आहेस का ग्रोक?” तर दुसऱ्या युझरने लिहिले, “टोपीमध्ये कदाचित बॅलन्सिंग सेन्सर असावा, तो पडल्यामुळे रोबोटही पडला.” आणखी एका युझरने रोबोटच्या दृष्टिकोनातून समजावले, “डान्सची आज्ञा मिळाल्यावर रोबोट ॲनिमेशन (Animation) प्ले करतो. जर तो पडला तरी ॲनिमेशन चालू राहते, किंवा तो संतुलन राखण्याचा प्रयत्न करत असताना असे करतो.”

Robot Breakdance Video
Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

दरम्यान, या व्हिडिओमुळे रोबोटिक्सच्या भविष्यावर आणि मानवी हालचालींची नक्कल करण्याच्या क्षमतेवर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com