A Girl Was Beaten With Slipper Dainik Gomantak
देश

Viral Video: बाल निवारागृहात मुलीला चपलेने मारहाण, अधिकारी महिलेच्या मनमानीचा चिमुकल्यांसह कर्मचाऱ्यांनाही फटका

शासकीय बालगृहात काम करणाऱ्या अंजू, बेबी, दीपाली आदींनी बालगृहाच्या प्रमुखाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

Ashutosh Masgaunde

A Girl Was Beaten With Slipper By Official In A Children's shelter In Uttar Pradesh Agra:

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील सरकारी बालगृहाची प्रमुख अधिकारी असलेल्या महिलेने मुलांना चपलेने मारहाण केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओतून त्याचे सत्य समोर आले आहे.

मंगळवारी सरकारी बालगृहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये बालगृहाची प्रमुख पूनम पाल एका मुलीला चप्पलने बेदम मारहाण करताना दिसत आहे.

व्हिडिओ निदर्शनास आल्यानंतर जिल्हा दंडाधिकारी भानू चंद्र गोस्वामी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सरकारी बालगृहात तपासासाठी पाठवले. तपासात दोषी आढळल्यानंतर प्रमुख अधिकारी महिलेला पदावरून हटवण्यात आले आहे. तसेच तिच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस केली आहे.

पाचकुयन येथील सरकारी बालगृहात एकूण 28 बालके आहेत. बालगृहाच्या प्रमुख पूनम पालचे वर्तन मुले व कर्मचाऱ्यांशी चांगले नाही. बालसुधारगृहात तैनात असलेले कर्मचारी तिच्या हुकूमशाही वृत्तीने प्रचंड नाराज आहेत.

या संदर्भात बालसुधारगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही जिल्हाधिकारी भानू चंद्र गोस्वामी यांच्याकडे तक्रार केली आहे. येथे, जेव्हा मुलीवरील अत्याचाराचा व्हिडिओ समोर आला तेव्हा तत्काळ कारवाईसाठी तपास पथक बालसुधारगृहात पाठवले.

तपासासाठी आलेले शहर दंडाधिकारी आनंद कुमार यांनी सांगितले की, बालगृहात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर व्हिडिओ योग्य असल्याचे आढळून आले.

हा व्हिडिओ ४ सप्टेंबरचा आहे. मुलांसोबत बालगृह प्रमुखाचे वर्तन अमानवी होते. प्रथमदर्शनी, पूनम पाल दोषी आढळली आहे.

बालगृहात काम करणारी कविता सांगते की, तिची स्वच्छता कर्मचारी म्हणून नियुक्ती झाली आहे, पण बावगृहाची प्रमुख तिच्याकडून वैयक्तिक कामही करुन घेते. आया म्हणून काम करणारी बबिता म्हणते की, पूनम पाल रोज मुलांना मारते. या भीतीने अनेक मुले आजारी पडली आहेत. त्यांच्या उपचारातही दुर्लक्ष होत आहे. या सर्वाला विरोध केल्यावर कामावरुन हटवून कोर्टात खेचण्याची धमकी देते.

शासकीय बालगृहात काम करणाऱ्या अंजू, बेबी, दीपाली आदींनी बालगृहाच्या प्रमुखाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

जिल्हा परिविक्षा अधिकारी अजय पाल यांनी सांगितले की, व्हिडिओ समोर आल्यानंतर ते तपासासाठी सरकारी बालगृहात पोहोचले होते. त्यांनी आया व बालगृह प्रमुखांचे जबाब घेतले होते.

अधीक्षकांनी सांगितले की, मुलगी एक गेम खेळत होती, ज्यामध्ये तिने स्वतःला एका बॉक्समध्ये बंद केले होते. यानंतर मुलीने त्या बॉक्सची कडीही वरून लावलेली होती. मुलगी असे प्रकार सतत करत होती. हा प्रकार कळताच बालगृह प्रमुखाने रागाच्या भरात मुलीला मारहाण केली. तिने सिटी मॅजिस्ट्रेट आनंद कुमार यांच्यासमोर मुलीला मारहाण केल्याचे मान्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shefali Jariwala: तू नेहमी माझ्या हृदयात... शेफालीच्या मृत्यूनंतर पती दुःखातून सावरेना, बघा काय केलं? Watch Video

Nachinola House Fire: नास्नोळा येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला आग, 5 लाखांचे नुकसान

'माझे घर' योजनेचा लाभ घ्या; मुख्यमंत्री सावंतांचे गोमंतकीयांना आवाहन, 1972 पूर्वीची घरे नियमित होणार

Amba Ghat Landslide: कोकणात मुसळधार पावसाचा तडाखा, आंबा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

America Accident: अमेरिकेत भीषण अपघात! यू-टर्न घेणाऱ्या ट्रकला धडकली कार, तिघांचा जागीच मृत्यू; भारतीय चालकावर हत्त्येचा आरोप VIDEO

SCROLL FOR NEXT