AC Bus Fight Viral: सध्याच्या काळात सार्वजनिक वाहतूक (Public Transport) व्यवस्थेत प्रवास करताना प्रवाशांमध्ये कधी आणि कशावरुन वाद होईल, हे सांगता येत नाही. विशेषतः मेट्रो किंवा बसमध्ये होणाऱ्या अशा भांडणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच व्हायरल होत असतात. यावेळी एका एसी (AC) बसमध्ये दोन महिला प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली.
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ बसमधील (Bus) भांडणाच्या ऐन मध्यात शूट करण्यात आला. त्यामुळे वादाची नेमकी सुरुवात कशावरुन झाली, हे स्पष्ट होत नाही. मात्र, व्हायरल व्हिडिओतील कॅप्शननुसार ही लढाई सीटसाठी (Seat) सुरु झाल्याचे दिसत आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एसी बसच्या सीटवर बसलेल्या दोन महिलांमध्ये जोरदार बाचाबाची सुरु आहे. इतर भांडणांप्रमाणेच या भांडणानेही हिंसक वळण घेतले. दोन्ही महिला एकमेकींना मारत होत्या आणि एकमेकींचे केस ओढत होत्या. बसमधील इतर पुरुष आणि महिला प्रवासी त्यांना भांडणातून थांबवण्याचा आणि वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण महिला मात्र भांडण थांबवायला तयार नाहीत.
बसमध्ये उपस्थित असलेल्या लोकांनी हा प्रकार पाहून हाणामारीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, जो आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.
हा व्हिडिओ kuldeep_dahiya_1001 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. "महिला यात्री ने सिर्फ 1 सीट के लिए किया महाभारत" (महिला प्रवाशाने फक्त एका सीटसाठी महाभारत केले.) असे उपरोधिक कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया (Social Media) यूजर्संनी यावर अनेक गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत:
एका युजरने कमेंट केली, "बस फ्री लाईव्ह मॅच, WWE चा सामना सुरु आहे."
दुसऱ्या युजरने लिहिले, "नवऱ्याचा राग दुसऱ्या कुणावर तरी काढला."
तर, तिसऱ्या युजरने 'महिला महिलांची शत्रू आहे' असे मत व्यक्त केले.
याशिवाय, अनेक यूजर्संनी हसण्याचे इमोजी पोस्ट करत, 'पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये नेहमीच असे होते,' अशी प्रतिक्रिया दिली.
या भांडणाचा व्हिडिओ कधीचा आणि कोणत्या ठिकाणचा आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील अशा प्रकारच्या घटनांमुळे प्रवाशांची सुरक्षा आणि गैरसोय यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.