टीसींना 'बॉडी कॅमेऱ्यांचे' कवच! खोट्या विनयभंगाचे आरोप रोखण्यासाठी होतेय मागणी, तिकीट नसताना टीसीशी हुज्जत घालणाऱ्या महिलेचा Video Viral

Video Viral News: रेल्वेत तिकीट तपासणी करणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्यांसाठी 'बॉडी कॅमेरे' (Body Cameras) गरजेचे असल्याची जोरदार मागणी आता जोर धरु लागली आहे.
Video Viral News
Video ViralDainik Gomantak
Published on
Updated on

Ticket Checker Body Camera Demand: रेल्वेत तिकीट तपासणी करणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्यांसाठी 'बॉडी कॅमेरे' (Body Cameras) गरजेचे असल्याची जोरदार मागणी आता जोर धरु लागली आहे. कामाचा भाग म्हणून आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर महिला प्रवाशांकडून खोट्या विनयभंगाचे आरोप होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

Video Viral News
Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

सध्या सोशल मीडियावर (Social Media) होत असलेला व्हिडिओ @DeepikaBhardwaj नावाचा 'एक्स' या हॅंडलवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला प्रवासी विनातिकीट प्रवास करताना दिसत आहे. जेव्हा रेल्वे तिकीट तपासणी कर्मचारी अर्थात टीसी तिच्याकडे रेल्वे तिकीटाची मागणी करतो तेव्हा ती त्याच्याशी हुज्जत घालू लागते. त्याचवेळी, टीसी तिचा अंदाज पाहून रेकॉर्डिंग सुरु करतो. तिच्याकडे रेल्वे तिकीट नसल्याने थोडा वेळ ती त्याच्याशी बोलते. त्यानंतर ती तिथून पळ काढताना स्पष्टपणे व्हिडिओमध्ये दिसतेय.

यादरम्यान, ती सुरु असलेले रेकॉर्डिंग बंद करण्याचा देखील प्रयत्न करते. याच घटनेवरुन पुन्हा एकदा तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसाठी बॉडी कॅमेरांची मागणी होऊ लागली आहे.

कर्तव्य बजावताना मोठा धोका

पुरुष तिकीट तपासणी कर्मचारी त्यांची ड्यूटी व्यवस्थित पार पाडत असताना जर एखाद्या महिला प्रवाशाने त्यांच्यावर विनयभंगाचा किंवा गैरवर्तन केल्याचा आरोप केला, तर हे प्रकरण तात्काळ गंभीर स्वरुप धारण करते. सार्वजनिक ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या पुरुष कर्मचाऱ्यासाठी हा आरोप करिअर आणि प्रतिष्ठेसाठी अत्यंत घातक ठरु शकतो.

Video Viral News
Viral Video: 15 बायका, 30 मुलं आणि 100 सेवक! राजा 'मस्वाती' शाही लवाजम्यासह अबू धाबी विमानतळावर दाखल; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना

बॉडी कॅमच्या वापरामुळे केवळ गैर आरोप टाळता येणार नाहीत, तर कर्मचारी अधिक सुरक्षित आणि आत्मविश्वासाने आपले काम करु शकतील. त्यांना माहीत असेल की त्यांच्या कामाची प्रत्येक प्रक्रिया रेकॉर्ड होत आहे, ज्यामुळे दोन्ही बाजूंनी गैरवर्तन होण्याची शक्यता कमी होईल.

रेल्वे प्रशासन आणि इतर सार्वजनिक वाहतूक मंडळांनी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या कामातील धोके लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षेसाठी बॉडी कॅमची उपलब्धता त्वरित सुनिश्चित करावी, अशी मागणी कर्मचारी संघटना आणि नागरिकांकडून (Citizens) करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com