Manish Sisodia Dainik Gomantak
देश

मनीष सिसोदिया यांच्यावर मानहानीचा खटला, जाणून घ्या कोणी मागितले 100 कोटींचे नुकसान

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावरती मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्यावरती मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांच्या पत्नी रिंकी भुयान सरमा (Rinke Bhuyan Sarma) यांनी मंगळवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध दिवाणी न्यायाधीश न्यायालयात (कामरूप मेट्रो) गुवाहाटीमध्ये 100 कोटी रुपयांचा दिवाणी मानहानीचा खटला दाखल केला आहे. रिंकी भुयान सरमा यांचे वकील पद्मधर नायक यांनी सांगितले की, आशा आहे की बुधवारी हे प्रकरण सूचीबद्ध केले जाईल. (A defamation suit has been filed against Manish Sisodia see who asked for Rs 100 crore)

खरं तर, आम आदमी पार्टी (AAP) नेते मनीष सिसोदिया यांनी 4 जून रोजी पत्रकार परिषदेत आरोप केला होता की 2020 मध्ये भारत जेव्हा कोविड महामारीशी लढत होता तेव्हा आसामचे तत्कालीन आरोग्य मंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या व्यावसायिक भागीदारांच्या कंपन्यांना पीपीई किट पुरवण्याचे कंत्राट देखील दिले होते. आसाम सरकारने साथीच्या काळात पीपीई किटच्या पुरवठ्यामध्ये गैरव्यवहारात मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या कुटुंबाचा सहभाग असल्याचा आरोप देखील नाकारला आहे.

सध्या राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या आरोपांनंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर फौजदारी मानहानीचा खटला दाखल करण्याची धमकी देखील दिली होती. सरमा यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, आसाममध्ये तेव्हा पीपीई किट क्वचितच होती. ते म्हणाले, 'माझ्या पत्नीने पुढे येण्याचे धाडस दाखवले आणि जीव वाचवण्यासाठी सरकारला सुमारे 1500 किट दान केले होते आणि त्यांनी एक पैसाही घेतला नाही.

मुख्यमंत्र्यांनी कोविड-19 दरम्यान 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी' म्हणून जेसीबी इंडस्ट्रीजद्वारे पीपीई किट पुरवल्याबद्दल राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे (एचएचएम) तत्कालीन संचालक डॉ लक्ष्मणन यांच्याकडून मिळालेले कौतुक पत्रही यामध्ये जोडले होते. सरमा यांची पत्नी रिंकी सरमा भुयान या जेसीबी इंडस्ट्रीजमध्ये भागीदार राहिल्या आहेत.

मनीष सिसोदिया यांनी ट्विट करून म्हटले सांगितले होते की, 'माननीय मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा जी! जेसीबी इंडस्ट्रीजच्या नावावर 990 रुपये प्रति किट या दराने 5000 किट खरेदी करण्याचा तुमच्या पत्नीने केलेला करार आहे. कराराचा हा पेपर खोटा आहे का? आरोग्यमंत्री असताना तुमच्या पत्नीची कंपनी टेंडर न काढता खरेदी करण्याचे आदेश देणे हा भ्रष्टाचार नाहीये का?' सिसोदिया यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितले होते की, आसाम सरकारने इतर कंपन्यांकडून प्रति किट 600 रुपये दराने पीपीई किट खरेदी केले होते.

आप नेत्याने सांगितले की, सरमा यांनी “COVID-19 आणीबाणीचा फायदा घेत” त्यांच्या पत्नीच्या कंपनीला आणि मुलाच्या व्यावसायिक भागीदारांना 990 रुपयांचे पीपीई किट त्वरित पुरवण्याचे आदेश दिले होते. सिसोदिया यांनी आरोप केला होता की सरमा यांच्या पत्नीची फर्म वैद्यकीय उपकरणांचा व्यवसाय देखील करत नाहीत. मनीष सिसोदिया यांनी बातमीद्वारे उद्धृत केले की, "सरमा यांच्या पत्नीच्या फर्मला दिलेला करार रद्द करण्यात आला असला तरी, कंपनी पीपीई किट्सचा पुरवठा करू शकत नसल्यामुळे, त्यांच्या मुलाच्या व्यावसायिक भागीदारांच्या कंपनीला प्रति किट 1,680 रु. दराने दिले होते.

त्याचवेळी हिमंता बिस्वा सरमा यांची पत्नी रिंकू भुयान सरमा यांनी यापूर्वी सिसोदिया यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण देखील जारी केले होते. ते म्हणाले होते की महामारीच्या पहिल्या आठवड्यात आसाममध्ये एकही पीपीई किट उपलब्ध नाहीये. हे लक्षात घेऊन, मी एका व्यावसायिक ओळखीच्या व्यक्तीशी संपर्क साधला आणि खूप प्रयत्न करून NHM ला सुमारे 1500 PPE किट वितरित केले होते. नंतर मी NHM ला माझ्या CSR चा भाग म्हणून विचार करण्यासाठी पत्र लिहिले होते. त्यामध्ये मी एक पैसाही घेतला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT