Yamuna Expressway in Mathura, Car Rammed Into Bus 
देश

Yamuna Expressway वर कारची बसला धडक, अपघातानंतरच्या आगीत 5 जण जळाले, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

Viral Video: पोलिसांनी सांगितले की, बसमधील काही प्रवासी आपली सुटका करून घेण्यात यशस्वी झाले, परंतु कारमधील लोक जळून मरण पावले.

Ashutosh Masgaunde

A car collided with a bus on Yamuna Expressway, 5 people were burnt alive in the fire that broke out after the accident:

यमुना एक्स्प्रेस वेवर सोमवारी भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. येथे बसचे नियंत्रण सुटले आणि ती दुभाजकावर आदळली, त्यामुळे मागून येणारी कार बसला धडकली. अपघातादरम्यान बस आणि कारला भीषण आग लागली. या आगीत 5 जणांचा जिवंत जळाल्याने मृत्यू झाला. ही घटना मथुरेतील महावन पोलीस स्टेशन हद्दीतील माईल स्टोन 117 येथे घडली.

वरिष्ठ पोलीस अधीक्षक शैलेश पांडे म्हणाले, "यमुना एक्सप्रेसवेवर झालेल्या एका रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आग्राहून नोएडाला जाणाऱ्या बसचे नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर एक कारही बसला धडकली. बस आणि दोन्ही वाहनांना आग लागली.

पोलिसांनी सांगितले की, बसमधील काही प्रवासी आपली सुटका करून घेण्यात यशस्वी झाले, परंतु कारमधील लोक जळून मरण पावले.

आपघात झाल्यानंतर अर्धा तास उलटूनही अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले नव्हते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, या घटनेमागील कारणाबाबत अधिक माहिती गोळा केली जात आहे.

गेल्या महिन्यात यमुना एक्सप्रेस वे वर दोन बसची धडक होऊन किमान ४० जण जखमी झाले होते.

उत्तर प्रदेशमधील 6-लेन रुंद आणि 165.5 किमी लांबीचा एक्सप्रेसवे देशातील सहावा सर्वात लांब एक्सप्रेसवे आहे आणि तो ग्रेटर नोएडा ते आग्राला जोडतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: साडेतीन तास चर्चा,पण निर्णय नाहीच! काँग्रेसच्या युतीला 'आरजी'चा अडथळा; जागावाटप अधांतरी

Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेसला भीती उमेदवार चोरीची?

Goa Fraud Case: बनावट 'आयपीओ'चे आमिष; ज्येष्ठाची 4 कोटींची फसवणूक, कोल्हापूर येथून संशयिताला अटक

Goa Live News: 56th IFFI ईफ्फीत दिसलो सनी देवोलाचो हमशकल; Watch Video

पैसे परत न केल्यास FIR! वादग्रस्त 'कामसूत्र अँड ख्रिसमस' कार्यक्रमावर क्राईम ब्रँचची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT