MP CM car Issue: वाहनांमध्ये पाणी मिश्रित डिझेल टाकल्याने मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील १९ वाहनांना फटका बसला. पंपावरुन तब्बल १९ वाहनांना ओढत बाहेर काढवे लागले. रतलाम येथील पंपावर पाणी मिश्रित डिझेलचा पुरवठा केला जात असल्याने याचा फटका मुख्यमंत्र्यांच्या वाहनांना बसला. याप्रकरणीचा एक व्हिडिओ पीटीआय वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केला आहे.
मध्य प्रदेशातील रतलाम येथे शुक्रवारी (२७ जून) 'एमपी राईज २०२५' कॉन्क्लेव्ह होणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी आलेले मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील वाहनांमध्ये डिझेलऐवजी पाणी भरण्यात आले. गुरुवारी रात्री धोसी गावाजवळील भारत पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी ताफ्यातील सुमारे १९ वाहने गेली होती. तिथे डिझेल भरल्यानंतर काही अंतर प्रवास करताच अचानक सर्व वाहने थांबली.
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सर्व वाहनांमधून डिझेल बाहेर काढले असता त्यात पाणी आढळून आले. यामुळे एकच गोंधळ उडाला. पेट्रोल पंपावरील वाहनांच्या टाक्या तपासल्या असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याचवेळी काही इतर ट्रक चालकही अशीच तक्रार घेऊन पेट्रोल पंपावर पोहोचले.
रतलाम येथील प्रादेशिक परिषदेसाठी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव सहभागी होण्यासाठी जात होते. यासाठी इंदूरहून सुमारे १९ इनोव्हा कार मागवण्यात आल्या होत्या. गुरुवारी रात्री पेट्रोल पंपावरून या कारमध्ये डिझेल भरल्यानंतर, काही अंतर गेल्यानंतर सर्व कार थांबल्या. त्यानंतर प्रशासनाने पेट्रोल पंप सील केला.
ही घटना रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. धोसी गावात असलेल्या भारत पेट्रोलियमच्या शक्ती फ्युएल्स पेट्रोल पंपावर घडलेल्या घटनेची माहिती मिळताच भारत पेट्रोलियमचे प्रादेशिक अधिकारीही तेथे पोहोचले. वाहनात २० लिटर डिझेल भरलेले आढळून आले, त्यापैकी १० लिटर पाणी बाहेर काढण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.