Crime: आश्रमात सुरु होते अश्लील उद्योग, 20 वर्षे गोव्यात राहिलेल्या पाखंडी बाबाला अटक; अश्रमातून व्हायग्रा, गांजा जप्त

Chhattisgarh Crime News: या आश्रमावर अनेक दिवसांपासून पोलिसांनी संशय होता. अखेर छापेमारीत या आश्रात सुरु असणारे काळे धंदे समोर आले आहेत.
Tarun Agrawal From Chhattisgarh
Police Arrested Tarun Agrawal From ChhattisgarhDainik Gomantak
Published on
Updated on

छत्तीसगड: आश्रमाच्या नावाखाली अश्लील उद्योग करणाऱ्या पाखंडी बाबाला छत्तीसगड पोलिसांनी अटक केली आहे. या भोंदू बाबाने २० वर्षे गोव्यात वास्तव्य करुन योग आश्रम सुरु केला होता. त्याच धर्तीवर तो छत्तीसगमध्ये देखील हा उद्योग करायचा. स्थानिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भोंदू बाबाला अटक करुन त्याच्याकडून गांजा, सेक्स टॉय, व्हायग्राच्या गोळ्या, इंजेक्शन अशा आक्षेपार्ह गोष्टी जप्त केल्या आहेत.

डोंगरगड येथील प्रज्ञागिरी परिसरात तरुण अग्रवाल उर्फ सोनू (४५) हा आश्रम चालवत होता. स्थानिकांच्या तक्रारीनंतर २५ जून २०२५ रोजी पोलिसांनी आश्रमावर छापा टाकून भोंदू बाबाला अटक केली तसेच, त्याच्याकडून आक्षेपार्ह गोष्टी जप्त केल्या.

पोलिसांनी आश्रमातून दोन किलो गांजा, सेक्स टॉय, नशेच्या गोळ्या, व्हायग्राच्या गोळ्या आणि इंजेक्शन जप्त केली आहेत. याशिवाय काही ऑडिओ आणि व्हिडिओचे उपकरणे देखील ताब्यात घेण्यात आली आहेत.

Tarun Agrawal From Chhattisgarh
Dabolim: ‘दाबोळी’ विमानतळ परिसरात वाहतुकीचे तीनतेरा! 20 दिवसांत दोघांचा बळी, रस्ता ओलांडणे बनले जीवघेणे

गेल्या काही दिवसांपासून आश्रमचे काम सुरु होते. आश्रम अधिक सुसज्ज करण्याचे काम सुरु होते. यातील बाथरुमला देखील मार्बल्स लावण्यात आले आहेत. पोलिसांनी छापेमारीनंतर हा आश्रम सील केला आहे.

सोनू तब्बल वीस वर्षे गोव्यात वास्तव्यास होता येथे त्याने पाटणे येथे तरुण योगा केंद्र स्थापन केले होते. येथे विदेशी पर्यटकांना तो योगा शिकवण्याचे काम करत होता. सोनूने १०० पेक्षा अधिक देश फिरल्याचा दावा केला असून, तो स्वत:ला आंतरराष्ट्रीय योग गुरु देखील असल्याचे सांगतो.

 सोनूने १० पेक्षा अधिक एनजीओ स्थापन केल्या असून, तो त्यांचा संचालक असल्याचा दावा त्याने केला आहे. या संस्थांना विदेशातून देणगी मिळते असा त्याचा दावा आहे. पोलिसांनी सोनूची बँक खाती, सोशल नेटवर्क तपासण्यास सुरुवात केली आहे.

आंतरराष्ट्रीय योग गुरु असल्याचा दावा करणाऱ्या सोनूकडे विदेशी प्रमाणपत्र देखील आहेत. गोव्यात त्याने स्वत:ची जागा खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. गोव्यातून मूळ गावी परतल्यावर त्याने येथे जमीन, फार्महाऊस तयार केले आणि त्यालाच तो आश्रम देखील म्हणतो.

Tarun Agrawal From Chhattisgarh
Glacier Damage: हिमनद्यांना पडली मोठी छिद्रे! हवामान बदलाचा फटका; स्वित्झर्लंडमध्ये दिसली अनोखी प्रक्रिया

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोंदूबाबा सोनू तरुणांना योगा शिकवण्याच्या नावाखाली त्यांना व्यसनाचा नाद लावत होता. रात्रीच्या वेळेत आश्रमात विविध संशयास्पद गोष्टी व्हायच्या असेही पोलिसांनी म्हटले आहे. या आश्रमावर अनेक दिवसांपासून पोलिसांनी संशय होता. अखेर छापेमारीत या आश्रात सुरु असणारे काळे धंदे समोर आले आहेत.

अधिकच्या माहितीनुसार, सोनूने सहा करोड रुपयांना ही जागा खरेदी केली होती. या आश्रमाचे काम अद्याप सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com