8th Pay Commission Dainik Gomantak
देश

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! 8 व्या वेतन आयोगात 3.83 फिटमेंट फॅक्टरची मागणी, पगारात 283 टक्क्यांची वाढ होणार?

8th Pay Commission latest updates: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ८ व्या वेतन आयोगाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.

Sameer Amunekar

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ८ व्या वेतन आयोगाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. कर्मचारी संघटनांनी सरकारकडे ३.८३ फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची मागणी केली आहे. जर सरकारने ही मागणी मान्य केली, तर कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात (Basic Salary) तब्बल २८३ टक्क्यांची प्रचंड वाढ पाहायला मिळू शकते. वाढती महागाई आणि राहणीमानाचा खर्च लक्षात घेता ही मागणी करण्यात आली आहे.

३.८३ फिटमेंट फॅक्टर: पगाराचे नवे समीकरण

७ व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर २.५७ होता, ज्यानुसार किमान मूळ वेतन १८,००० रुपये निश्चित करण्यात आले होते. आता ८ व्या वेतन आयोगात ही मर्यादा वाढवून ३.८३ करण्याची मागणी आहे. हे सूत्र लागू झाल्यास काय बदल होईल, ते खालीलप्रमाणे:

  • किमान वेतन: १८,००० रुपयांवरून थेट ६९,००० रुपये होणार.

  • पेन्शनधारकांना लाभ: या निर्णयाचा फायदा ५० लाखांहून अधिक कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे.

पगार वाढीचा अंदाज

८ व्या वेतन आयोगांतर्गत कर्मचारी संघटनांनी मागणी केलेल्या ३.८३ फिटमेंट फॅक्टरमुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या नव्या सूत्रानुसार, सर्वात खालच्या स्तरावरील म्हणजेच लेव्हल १ चा १८,००० रुपये असलेला मूळ पगार थेट ६९,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.

तसेच, लेव्हल ३ साठी २१,७०० रुपयांवरून ८३,१११ रुपये, लेव्हल ५ साठी २९,२०० रुपयांवरून १,११,८३६ रुपये आणि उच्च पदस्थ लेव्हल ९ च्या कर्मचाऱ्यांचा पगार ५३,१०० रुपयांवरून थेट २,०३,३७३ रुपयांपर्यंत वाढू शकतो. ही पगारवाढ केवळ महागाईवर मात करण्यासाठी नसून कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

कधी होणार अंमलबजावणी?

न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ३ नोव्हेंबर २०२५ रोजी या आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. जरी अधिकृत तारीख १ जानेवारी २०२६ असली, तरी प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी २०२७ उजाडण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT