8th Pay Commission Latest update Dainik Gomantak
देश

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! वार्षिक वेतनवाढ दुप्पट करण्याचा प्रस्ताव, इन्क्रिमेंट 3 टक्क्यांवरून थेट 6 टक्के

8th Pay Commission Latest update: केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची चर्चा सुरू झाली आहे.

Sameer Amunekar

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची चर्चा सुरू झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनरचनेत सुधारणा करण्याच्या प्रक्रियेदरम्यान आता वार्षिक इन्क्रिमेंटमध्ये मोठी वाढ करण्याची मागणी पुढे आली आहे. सध्या मिळणारी 3 टक्के वार्षिक वेतनवाढ अपुरी असल्याचे सांगत विविध कर्मचारी संघटनांनी ती थेट 6 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची चर्चा सुरू झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनरचनेत सुधारणा करण्याच्या प्रक्रियेदरम्यान आता वार्षिक इन्क्रिमेंटमध्ये मोठी वाढ करण्याची मागणी पुढे आली आहे. सध्या मिळणारी 3 टक्के वार्षिक वेतनवाढ अपुरी असल्याचे सांगत विविध कर्मचारी संघटनांनी ती थेट 6 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे.

जर या मागणीचा वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये समावेश झाला, तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात भविष्यात अधिक वेगाने वाढ होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम निवृत्तीनंतरच्या आर्थिक लाभांवर आणि पेन्शनच्या गणनेवरही होऊ शकतो.

3 टक्के वार्षिक वाढ अपुरी असल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा

सध्याच्या वेतन व्यवस्थेनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनावर दरवर्षी साधारण 3 टक्के इन्क्रिमेंट दिले जाते. मात्र वाढती महागाई, दैनंदिन खर्च आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळे ही वाढ पुरेशी नसल्याची भावना कर्मचारी संघटनांनी व्यक्त केली आहे.

कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, अनेक खासगी क्षेत्रांमध्ये अनुभव आणि कामगिरीनुसार तुलनेने जास्त वेतनवाढ मिळते. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढीच्या नियमांचा फेरविचार करणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.

विविध कर्मचारी संघटनांनी मांडली 6 टक्के वाढीची मागणी

भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने (BPMS) आपल्या प्रस्तावामध्ये वार्षिक इन्क्रिमेंट 3 टक्क्यांवरून 6 टक्के करण्याची मागणी मांडली आहे. या प्रस्तावामुळे दीर्घकालीन वेतनवाढीचा फायदा कर्मचाऱ्यांना मिळू शकतो.

नॅशनल कौन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशीनरीच्या (NCJCM) कर्मचारी बाजूनेही वार्षिक वेतनवाढ वाढवण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.

याशिवाय मिनिस्ट्रियल स्टाफ असोसिएशनने काही कर्मचाऱ्यांसाठी किमान 5 टक्के वार्षिक इन्क्रिमेंटची सूचना केली आहे. विशेषतः अनेक वर्षे एकाच पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अधिक वेतनवाढ मिळावी, असा या मागणीमागचा मुख्य उद्देश आहे.

DA आणि वार्षिक इन्क्रिमेंटमध्ये नेमका फरक काय?

कर्मचारी संघटनांनी महागाई भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ या दोन गोष्टी वेगळ्या असल्याचे स्पष्ट केले आहे. महागाई भत्ता म्हणजे वाढत्या महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी दिला जाणारा आर्थिक लाभ.

तर वार्षिक इन्क्रिमेंट हा कर्मचाऱ्याचा अनुभव, सेवा कालावधी आणि मूळ वेतनातील प्रत्यक्ष वाढ याच्याशी संबंधित असतो. त्यामुळे केवळ DA वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात अपेक्षित वाढ होत नाही, असा कर्मचाऱ्यांचा युक्तिवाद आहे.

निर्णय झाल्यास पगारावर काय परिणाम होऊ शकतो?

वार्षिक इन्क्रिमेंटचा दर 3 टक्क्यांवरून 6 टक्के करण्यात आल्यास दीर्घकालीन कालावधीत कर्मचाऱ्यांच्या बेसिक पेमध्ये मोठा फरक पडू शकतो. मूळ वेतन वाढल्यास त्याच्याशी संबंधित काही इतर आर्थिक लाभांच्या गणनेवरही परिणाम होण्याची शक्यता असते.

मात्र 6 टक्के वार्षिक इन्क्रिमेंटचा प्रस्ताव अद्याप मागणीच्या स्वरूपात असून, तो अंतिम निर्णय किंवा मंजूर शिफारस नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. 8व्या वेतन आयोगाच्या बैठका आणि पुढील शिफारशींकडे आता लाखो केंद्रीय कर्मचारी उत्सुकतेने लक्ष ठेवून आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravindra Jadeja ODI Career: रवींद्र जडेजाची वनडे कारकीर्द संपुष्टात? न्यूझीलंड मालिकेपूर्वी चेतेश्वर पुजाराच्या वक्तव्यानं क्रिकेट वर्तुळात खळबळ

Diwali Magazine Tradition: गोव्याच्या साहित्यविश्वाचा दिवाळी फराळ! जाणून घ्या दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा

Parliament Fight Video: संसद बनली कुस्तीचा आखाडा! सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी; लाथा-बुक्क्या अन् पाण्याच्या बाटल्यांनी हल्ला

Police Assault: कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले, टोळक्याने केला हल्ला; ऑन-ड्यूटी पोलिसाला किन्नरांकडून बेदम मारहाण

IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

SCROLL FOR NEXT