Army Soldiers Died in ladakh Twitter
देश

लडाखमध्ये भारतीय जवानांच्या वाहनाचा भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू, 12 गंभीर जखमी

दैनिक गोमन्तक

लदाख मध्ये भारतीय जवानांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. तुर्तुक (Turtuk Sector) सेक्टरमध्ये झालेल्या एका रस्ता अपघातात भारतीय लष्कराच्या 7 जवानांना आपला जीव गमवावा लागला. (Army Soldiers Died) या अपघातात इतर जवानांनाही गंभीर दुखापत झाली आहे. अपघातावेळी वाहनात एकूण 26 जवान होते. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. आणि गंभीर जखमी जवानांना भारतीय हवाई दलाच्या मदतीने उपचार केंद्रात पाठवण्यात आले आहे अशी माहिती लष्कराच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

परतापूर येथील संक्रमण शिबिरातून 26 जवान उपसेक्टर हनीफकडे जात असताना ही दुर्घटना घडली. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास थोईसपासून सुमारे 25 किमी अंतरावर वाहन अचानक रस्त्यावरून घसरले आणि सुमारे 50-60 फूट खोल श्योक नदीत पडले. या अपघातात गाडीतील सर्व जण जखमी झाले आहे.

सर्व 26 जणांना परतापूर येथील 403 फील्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून लेहमधील सर्जिकल टीम परतापूरला पाठवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत सात जवानांना मृत घोषित करण्यात आले आहे. त्याचबरोबर इतर अनेक जवानांनाही गंभीर दुखापत झाली आहे. लष्कराचे वाहन कोणत्या कारणांमुळे रस्त्यावरून घसरले आणि नदीत पडले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT