काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलणार ?

महत्त्वाच्या विधानसभा निवडणुकांवर होऊ शकतो परिणाम
Rahul Sonia Gandhi
Rahul Sonia GandhiDainik Gomantak
Published on
Updated on

काँग्रेस अध्यक्षपद निवडणूकीवरुन पक्षात बऱ्याचदा पक्षातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप झाल्याचे संपूर्ण देशाने पाहीले आहे. कित्येक दिवस काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद हे रिक्त आहे. तर हंगामी अध्यक्ष म्हणून ज्येष्ट नेत्या सोनिया गांधी हा कारभार पाहत आहेत. असे असले तरी या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणारी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलली जाऊ शकते. त्यासाठी काही पक्षाचे नेते वकिली करत आहेत. (Congress to postpone presidential election? )

Rahul Sonia Gandhi
UGCच्या नियमानुसार असा करा क्वाड फेलोशिपसाठी अर्ज

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये वर्षाच्या अखेरीस महत्त्वाच्या विधानसभा निवडणुका होणार असून या निवडणुकांमध्ये काँग्रेसला पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागले, असे पक्षाच्या काही नेत्यांचे मत आहे. राहुल गांधींवर पडेल आणि यामुळे राहुल गांधींसह संपूर्ण गांधी कुटुंबाची पुन्हा एकदा बदनामी होऊ शकते. त्यामुळे पुढील वर्षी जानेवारीपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा सल्ला काही नेत्यांनी दिला असून, त्यावरही विचार केला जात आहे.

अशा परिस्थितीत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुढील वर्षी जानेवारीपर्यंत पुढे ढकलू शकते. मात्र, त्यावर अद्याप विचार सुरू असून, याबाबत अंतिम निर्णय होणे बाकी आहे. दरम्यान, काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखालील निवडणूक समिती निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहे.

Rahul Sonia Gandhi
लडाखमध्ये भारतीय जवानांच्या वाहनाचा भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू, 12 गंभीर जखमी

निवडणूकीला सामोरे जाण्याचे नेत्यांसमोर आव्हान

सध्या राजस्थान आणि छत्तीसगढ या दोनच राज्यांत स्वबळावर सत्तेत असलेल्या काँग्रेसला लोकसभा निवडणुकीपूर्वी हिमाचल प्रदेश, गुजरात, कर्नाटक, त्रिपुरा, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. ज्या राजस्थानमध्ये काँग्रेसच्या चिंतन शिबिराचे आयोजन होत आहे, तिथेच काँग्रेसला पुढच्या वर्षी सत्ता शाबूत राखता येईल काय, असा प्रश्न काँग्रेसच्या वर्तुळात उपस्थित केला जात आहे. अंतर्गत कलहाने ग्रासलेल्या काँग्रेसपुढे पक्ष मजबूत करण्यासाठी व्यापक संघटनात्मक फेरबदल करण्याचे तसेच निवडणूक रणनीतीत कल्पकता आणण्याचे आव्हान आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com