Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
देश

PM Modi’s Foreign Trip: 9 वर्षात 63 परदेश दौरे, आता PM मोदी जाणार नेपाळला

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2022 मध्ये त्यांच्या परदेश दौऱ्यात तीन दिवसांचा युरोप दौरा पूर्ण करुन मायदेशी परतत आहेत. युरोपमध्ये त्यांनी जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सचा दौरा केला. युरोप दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर पीएम मोदींच्या पुढील दौऱ्याची माहिती समोर येत आहे. पीएम मोदी पुढच्या दौऱ्यात नेपाळला (Nepal) जाणार असून सरकारकडून यासंबंधीची औपचारिक घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत 63 परदेश दौऱ्यांदरम्यान 115 देशांपैकी कोणत्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) सर्वाधिक भेट दिली आहे, याची माहिती आहे का?

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करत म्हटले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तीन दिवसीय तीन देशांचा दौरा अतिशय फलदायी ठरला. या भेटीमुळे व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध, नव्याने भागीदारी, नवकल्पना आणि कौशल्य विकासासाठी सहकार्याला चालना मिळाली. तसेच युरोपियन भागीदारांसोबतचे सहकार्य आणखी वाढवण्याची संधीही निर्माण झाल्या आहेत." तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनीही ट्विट करत म्हटले होते की, फ्रान्स (France) दौरा "अत्यंत फलदायी" ठरला.

बुद्धाचे जन्मस्थान असलेल्या लुंबिनीला पंतप्रधान मोदी भेट देणार

पीएम मोदी आता काही दिवसांनी 16 मे रोजी नेपाळला भेट देणार आहेत. त्यादरम्यान ते भगवान बुद्धांचे जन्मस्थान असलेल्या लुंबिनीला भेट देतील. नेपाळच्या पंतप्रधानांचे प्रेस सल्लागार अनिल परियार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान मोदी हिमालयीन देशाला भेट देत आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदी त्यांच्या एक तासाच्या दौऱ्यात पश्चिम नेपाळमधील लुंबिनीला भेट देणार आहेत. बुद्ध पौर्णिमा ही भगवान बुद्धांची जयंती म्हणून साजरी केली जाते. 2019 मध्ये दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिला नेपाळ दौरा असेल, असे त्यांनी सांगितले. मोदींसोबत नेपाळचे पंतप्रधान देउबाही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) अद्याप पंतप्रधान मोदींच्या नेपाळ दौऱ्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

64 व्या परदेश दौऱ्यात नेपाळची भेट

पंतप्रधान मोदी नेपाळला रवाना होत असताना, पंतप्रधान म्हणून त्यांचा हा 64 वा परदेश दौरा असणार आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या 63 व्या परदेश दौऱ्यात युरोपला भेट दिली, तिथे त्यांनी जर्मनी, डेन्मार्क (Denmark) आणि फ्रान्सला भेट दिली.

तसेच, मे 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी भूतानचा पहिला परदेश दौरा केला होता. पंतप्रधान म्हणून त्यांनी आधी भूतानला, नंतर ब्राझीलला भेट दिली होती. त्यानंतर ते नेपाळ, जपान आणि अमेरिकेले गेले होते. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल 4 महिन्यांनंतर मोदी पहिल्यांदाच अमेरिकेला गेले होते. तेव्हापासून पीएम मोदींनी सर्वाधिक अमेरिकेला भेट दिली असून आतापर्यंत 7 वेळा या देशाला भेट दिली आहे.

चीनसह 3 देशांतील दुसऱ्या क्रमांकाचा परदेश दौरा

विशेष म्हणजे, कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये पंतप्रधान मोदी परदेशात गेले नव्हते. तर कोरोना संकटाच्या काळात लस आल्यानंतर त्यांनी 2021 मध्ये अमेरिकेसह 3 परदेश दौऱ्यांमध्ये 4 देशांचा दौरा केला.

पंतप्रधान मोदींनी सर्वाधिक 7 वेळा अमेरिकेला भेट दिली आहे. यानंतर त्यांनी सर्वाधिक फ्रान्स, चीन आणि रशियाला भेट दिली. पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत 5 वेळा फ्रान्सला भेट दिली आहे. या भेटीपूर्वी पीएम मोदी ऑगस्ट 2019, जून 2017, नोव्हेंबर 2015 आणि एप्रिल 2015 मध्ये फ्रान्सला गेले आहेत. तो 5 वेळा रशियालाही गेला आहे.

पीएम मोदींनी जुलै 2015 मध्ये पहिल्यांदा रशियाला भेट दिली होती, तर त्यांचा शेवटचा रशिया दौरा सप्टेंबर 2019 मध्ये होता. एप्रिल 2015 मध्ये पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच चीनला गेले होते. त्यानंतर सप्टेंबर 2016 मध्ये चीनला गेले. त्यानंतर सप्टेंबर 2017, 26 एप्रिल 2018 आणि जून 2018 मध्ये त्यांनी चीनला भेट दिली.

नेपाळ-जपानसह 3 देशांना 4-4 भेटी

चीन, फ्रान्स आणि रशियानंतर पीएम मोदींनी नेपाळ, जपान आणि सिंगापूरला 4 वेळा भेट दिली असून मे च्या मध्यात ते या हिमालयीन देशाला पाचवी भेट देणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT