Uttarakhand Haldwani Violence 
देश

Haldwani Violence: उत्तराखंडमध्ये का उसळला हिंसाचार, शूट अ‍ॅट साइटचे आदेश का देण्यात आले? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Uttarakhand Violence: या संपूर्ण गोंधळात जॉनी, अनस, रीस फहीम, इसरार आणि सिवान नावाच्या लोकांचा मृत्यू झाला असून 300 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

Ashutosh Masgaunde

6 killed in Uttarakhand's Haldwani after illegal madrassa and mosque were demolished:

उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील हल्द्वानी येथील बनभुलपुरा भागात गुरुवारी अत्यंत भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. बेकायदा अतिक्रमण पाडण्याची कारवाई करण्यासाठी पोहोचलेल्या महापालिका आणि पोलिसांच्या पथकाला मोठ्या हिंसाचाराचा सामना करावा लागला.

येथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनी पोलिस दलावर दगडफेक सुरू केली, ज्यात अनेक पोलिस जखमी झाले.

पण ही परिस्थिती का निर्माण झाली? काय आहे हा सगळा वाद? राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दंगलखोरांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश का दिले आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

गुरुवारी हल्द्वानी येथील बनभुळपुरा भागात महापालिकेने जेसीबी मशिन लावून बेकायदा मदरसा आणि नमाजची जागा जमीनदोस्त केली.

बेकायदा मशीद व मदरशावर प्रशासनाचा बुलडोझर फिरताच तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले संतप्त जमावाने अनेक वाहने पेटवून दिली तसेच जेसीबीचीही तोडफोड केली.

यानंतर परिसरात निर्माण झालेली हिंसक परिस्थिती पाहता कर्फ्यू लागू करण्यात आला व दंगलखोरांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले.

राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनीही राजधानी डेहराडूनमध्ये उच्चस्तरीय बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला आणि अनियंत्रित घटकांशी कठोरपणे कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

हिंसाचारात ६ जणांचा मृत्यू

या हिंसाचारात ६ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. पोलीस कर्मचारी आणि सामान्य नागरिकांसह अनेक जण जखमी झाले आहेत. संपूर्ण हल्द्वानी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दंगलखोरांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत, यावरून परिस्थिती किती नाजूक आहे, याचा अंदाज येतो. हिंसाचार आणि अफवा रोखण्यासाठी गुरुवारी रात्रीपासून शहरात इंटरनेट बंद करण्यात आले. यासोबतच आज सर्व शाळा बंद राहणार आहेत.

या संपूर्ण गोंधळात जॉनी, अनस, रीस फहीम, इसरार आणि सिवान नावाच्या लोकांचा मृत्यू झाला असून 300 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

हिंसाचार का झाला?

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यातील सरकारी जमिनींवरील बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने बनभुळपुरा येथील इंदिरा नगर परिसरात मलिक बागेत बांधलेला बेकायदा मदरसा व नमाजची जागा जेसीबी मशिनच्या सहाय्याने जमीनदोस्त केली.

यानंतर परिसरातील लोकांनी पोलिस आणि प्रशासनावर दगडफेक केली, ज्यात अनेक पोलिस जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, यादरम्यान तेथे उपस्थित असलेल्या अनेक पत्रकारांनाही दुखापत झाली आहे. बेकायदेशीर शस्त्रांनी पोलिसांवर गोळीबार केल्याचेही बोलले जात आहे.

बेकायदेशीर

मदरसा आणि नमाजची जागा पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे महापालिका आयुक्त पंकज उपाध्याय यांनी म्हटले आहे.

बेकायदेशीर मदरसा आणि नमाजची जागा सील करण्यात आली होती आणि ती आता पाडण्यात आली आहे.

या हिंसक घटनेनंतर हल्द्वानीमध्ये तणावाचे वातावरण आहे. पोलीस दलाची सतत गस्त सुरू आहे. बचावासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: कासवाडा- तळावली येथे घरावर कोसळले वडाचे झाड

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT