Panaji Municipality : महापालिका मार्केटच्या रंगल्या भिंती; बाजार समितीचे दुर्लक्ष

Panaji Municipality : मार्केट स्वच्छतेकडे कानाडोळा
Panaji Municipality  wall
Panaji Municipality wall Dainik Gomantak
Published on
Updated on

Panaji Municipality : पणजी महानगरपालिकेच्या मार्केटमध्ये सध्या अस्वच्छतेचे साम्राज्य दिसत आहे. महानगरपालिकेची मार्केट समितीकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

कोरोनाचे संक्रमित हळूहळू वाढू लागले आहेत, येथील गर्दी लक्षात घेता हा परिसर स्वच्छ ठेवण्याकडे महानगरपालिकेला आता लक्ष पुरवावे लागणार आहे.

स्वच्छता ही काही नावालाच असल्याचे या मार्केटकडे पाहिल्यानंतर दिसत आहे. मार्केटच्या भिंती आणि कोपरे गुटखा-तंबाखू व पान खाऊन थुंकणाऱ्यांनी पुन्हा रंगविलेले आहेत. त्याशिवाय ज्या पद्धतीने मार्केट परिसर स्वच्छ दिसायला हवा तसा दिसत नाही. विशेष बाब म्हणजे सध्या विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने पणजीत येतात, तेव्हा ते प्रामुख्याने मार्केट परिसरात फिरतात.

काही दिवसांपूर्वी जपानच्या एका समूहातील पर्यटक चक्क प्रवेशद्वारात टाकण्यात येणारा कचरा आपल्या गटातील व्यक्तींना दाखवित होता. त्यावरून मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना किंवा भाजीविक्रेत्यांना शिस्त राहिलेली नाही, असेच दिसते.

कचरा प्रकल्प असतानाही त्याठिकाणी जाऊन कचरा टाकण्याचे येथील व्यवसायिक टाळाटाळ करतात. आपले दुकान आणि त्याभोवतालचा परिसर स्वच्छ असावा, असे कोणालाही वाटत नाही.

Panaji Municipality  wall
Goa Police: 7 पोलिस अधिकाऱ्यांना मुख्‍यमंत्री सुवर्ण पदके

गाळेधारकांची दादागिरी

महानगरपालिका कोणतेही भाडे आकारत नाही, केवळ सोपो कर आकारते. भाडे आकारत नसल्याने येथील दुकान गाळे मालकांची एकप्रकारची दादागिरी असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

महानगरपालिकेची मालकी असल्याने मार्केटच्या स्वच्छता व इतर कामांसाठी मार्केट समिती नेमली जाते. परंतु मार्केट समितीला येथील स्वच्छतेविषयी काहीही घेणेदेणे नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com