5G Service In India  Dainik Gomantak
देश

5G Services in India: देशात सर्वात आधी 'या' शहरांमध्ये सुरू होणार 5G सेवा; तुमचे शहर आहे का यादीत पाहा?

जिओ, एअरटेलतर्फे भारतातील निवडक शहरांमध्ये 5G सेवेस प्रारंभ

गोमन्तक डिजिटल टीम

5G Services in India: भारतातील ऑक्टोबर 2022 पासून 5G सेवेला अधिकृतरित्या सुरवात झाली. दुरसंचार विभागाच्या घोषणेनुसार देशात सुरवातीला 13 शहरांमध्ये ही सेवा सुरू होणार होती. यात अहमदाबाद, बंगळूर, चंदीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनौ, पुणे, दिल्ली आणि मुंबईत ही सेवा सुरू होणार आहे.

तथापि, सरकारने सांगितलेल्या सर्व शहरात अद्याप कनेक्टिव्हिटीचा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे सध्या एअरटेल आणि जिओ या सेवा पुरवठादारांनी निवडक ठिकाणी 5G सेवेस सुरवात केली आहे. \

जिओने ऑक्टोबर 2022 पासून मुंबई, दिल्ली, वाराणसी आणि कोलकाता येथे 5G सेवा नेटवर्क उपलब्ध केले आहे. तर एअरटेलने दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद, सिलीगुडी, नागपुर आणि वाराणसी येथे ५ जी प्लॅन लाँच केले आहेत. जिओ आणि एअरटेल टप्प्याटप्प्याने एकाएका शहरात ५जी नेटवर्क पुर्ण करत आहेत.

व्होडाफोन आयडीयाने मात्र आत्तापर्यंत त्यांच्या 5G रोलआऊट तारखेची घोषणा केलेली नाही. तथापि आगामी आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात ते 5G रोलआऊट जाहीर करतील. सर्व युजर्सना 5G स्मार्टफोन वापरणाऱ्या सर्व युजर्सना सध्या तरी 5G इंटरनेट सेवा मिळत नाही आहे. ज्या शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे, आणि आगामी काही महिन्यात 5G सेवा मिळणार आहे, अशा शहरांची यादी खाली देत आहोत.

5G सेवा असलेली शहरे

दिल्ली, मुंबई, वाराणसी (जिओ आणि एअरटेल), कोलकाता (जिओ), चेन्नई , बंगळूर, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर (सर्व एअरटेल)

या शहरात लवकर सुरू होणार 5G सेवा

अहमदाबाद, चंदीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, पुणे (सर्व जिओ आणि एअरटेल), जामनगर, चेन्नई, लखनौ, बंगळूर (सर्व जिओ), कोलकाता (Airtel)

दरम्यान, दुरसंचार विभागाच्या माहितीनुसार 2 ते 3 वर्षात 5G कनेक्टिविटी देशभरात लागू होईल. जिओने 5G प्लॅननुसार जिओ डिसेंबर 2023 पर्यंत भारतभरात ही सेवा देण्याची तयारी करत आहे. तर एअरटेल या वर्षाच्या अखेरपर्यंत देशातील सर्व प्रमुख शहरात 5G उपलब्ध करणार आहे.

नवे सिम खरेदी करावे लागणार नाही

जिओ आणि एअरटेलच्या घोषणेनुसार जे युजर सध्या 4G सिम वापरतात त्यांना 5G सेवेसाठी नवे सिम कार्ड खरेदी करावे लागणार नाही. 5G सपोर्ट असणारे स्मार्टफोन डिफॉल्ट सिममध्ये ऑटोमेटिकली 5G नेटवर्कशी कनेक्ट होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT