Himachal Candidate List: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून राज्यातील राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. बुधवारी राज्यातील सत्ताधारी भाजपने त्यांची 62 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. तर काँग्रेसनेही 46 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
विद्यमान मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना पुन्हा मंडी जिल्ह्यातील सेराज मतदारसंघातून मैदानात उतरवण्यात आले आहे. जयराम ठाकूर हे पाचवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत आणि आता सातव्यांदा रिंगणात उतरले आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. भाजपचे अनिल शर्मा हे मंडीतून आणि सत्पाल सिंग सत्ती हे उनातून निवडणूक लढवणार आहेत.
काँग्रेस नेते मुकेश अग्निहोत्री हे उना जिल्ह्यातील हारोली मतदारसंघातून रिंगणात उतरणार आहेत. तर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुखविंदर सिंग सुखु आणि कुलदीपसिंग राठोड हे अनुक्रमे नादौन आणि थिओग येथून निवडणूक लढवत आहेत.
काँग्रेसने बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा तिकिट दिले आहे, यामध्ये माजी मुख्यमंत्री वीरभ्रद सिंग यांचे पुत्र विक्रमादित्य सिंग यांचाही समावेश आहे. त्यांना शिमला ग्रामीणमधून उमेदवारी दिली आहे.
काँग्रेस नेते आदित्य विक्रम सिंग हे गतनिवडणुकीत बंजर येथून पराभूत झाल होते, त्यांना पुन्हा तिथून उमेदवारी मिळण्याची शक्यता वाटत होती, पण त्यांचे नाव यादीत नसल्याने त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. सिंग यांनी २०१७ च्या निवडणुकीत ४५ टक्के मते घेतली होती. भाजपच्या सुरेंदर शौरी यांनी त्यांचा पराभव केला होता. शौरी यांना भाजपने पुन्हा बंजर येथून उमेदवारी दिली आहे.
असा आहे हिमाचल प्रदेशचा निवडणूक कार्यक्रम
17 ऑक्टोबर- निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार
25 ऑक्टोबर- अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस
27 ऑक्टोबर- अर्ज छाननी
29 ऑक्टोबर- अर्ज माघारीचा अखेरचा दिवस
12 नोव्हेंबर- मतदान
8 डिसेंबर- निकाल
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.