Girls Dainik Gomantak
देश

Missing Case: लैंगिक शोषणाच्या बळी ठरलेल्या 5 परदेशी मुली शेल्टर होममधून बेपत्ता

Uzbek Women Missing Case: नोकरीचे खोटे आश्वासन देऊन दिल्लीत तस्करी केलेल्या 5 परदेशी मुली शेल्टर होममधून बेपत्ता झाल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Uzbek Women Missing Case: नोकरीचे खोटे आश्वासन देऊन दिल्लीत तस्करी केलेल्या 5 परदेशी मुली शेल्टर होममधून बेपत्ता झाल्या आहेत. या मुलींना वेश्याव्यवसायासाठी भारतात आणले जात होते. काही महिन्यांपूर्वी या मुलींनी पळून जाऊन त्यांची तक्रार दिल्ली पोलिसांकडे केली होती, त्यानंतर या मुलींना शेल्टर होममध्ये ठेवण्यात आले होते.

काही महिन्यांपूर्वी, चाणक्यपुरी भागात उझबेकिस्तानमधील (Uzbekistan) 7 मुलींनी पोलीस आणि दिल्ली महिला आयोगाला सांगितले होते की, 'त्यांना उझबेकिस्तानमधून दिल्लीत आणून वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले होते, मात्र त्या तिथून पळून जाण्यात यशस्वी झाल्या.' मुलींच्या वक्तव्यावरुन पोलिसांनी चाणक्यपुरी पोलिस ठाण्यात एफआयआर (FIR) नोंदवला होता. एफआयआरनंतर या मुलींना शेल्टर होममध्ये ठेवण्यात आले होते.

त्यांना भारतात आणताच पासपोर्ट हिसकावण्यात आला

बुधवारी दिल्ली महिला आयोगाने सांगितले की, 'यातील 5 मुली शेल्टर होममधून बेपत्ता झाल्या आहेत.' त्या मुलींनी महिला आयोगाला सांगितले होते की, 'त्यातील काहींना नेपाळमार्गे दिल्लीत आणले तर काहींना वेगवेगळ्या वेळी टुरिस्ट व्हिसा आणि मेडिकल व्हिसावर थेट भारतात आणण्यात आले.'

तसेच, नेपाळ मार्गे दिल्लीत आणलेल्या मुलींचे पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे नेपाळमध्येच (Nepal) घेतल्यानंतर दिल्लीत आणण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, इतर मुलींना मेडिकल व्हिसावर दिल्लीत आणण्यात आले. त्यांना आणताच त्यांचे पासपोर्ट तस्करांनी जप्त केले.

अनेकांनी वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला

भारतात आल्यावर त्यांना वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले. विरोध केल्यावर त्यांना धमकावून मारहाण करण्यात आली, असे या महिलांनी तक्रारीत म्हटले आहे. जर त्यांनी आवाज उठवला तर त्यांना पकडून तुरुंगात टाकू, असे त्यांच्या तस्करांनी सांगितले होते. दिल्लीतील वास्तव्यादरम्यान वेगवेगळ्या लोकांनी आपल्यावर अनेकदा बलात्कार केल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवाय, आयोगाच्या तक्रारीवरुन दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी 10 पैकी 3 आरोपींना अटक केली. परंतु 7 आरोपींना पकडण्यात अपयश आले. या मुलींना त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी कागदपत्रांची गरज होती पण दिल्ली पोलिसांनाही त्यांचे पेपर मिळू शकले नाहीत, त्यामुळे त्या मुली त्यांच्या देशात परत जाऊ शकल्या नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT