Terrorist

Jammu-Kashmir 

 

Dainik Gomantak 

देश

जम्मू-काश्मीरमध्ये 2 चकमकीत 4 दहशतवादी ठार

शोपियानमध्ये मारले गेलेले दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचे (एलईटी) होते.

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी शोपियान व पुलवामामध्ये पोलिस आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार, शोपियानमध्ये मारले गेलेले दहशतवादी लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चे होते, तर पुलवामामध्ये मारले गेलेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

एलईटीच्या दोन दहशतवाद्यांची (Terrorist) ओळख पटली आहे. दहशतवादी सजाद अहमद चक हा ब्रारीपोरा, शोपियानचा रहिवासी होता, तर राजा बासित याकूब हा पुलवामा (Pulwama) येथील अचन लिटरमचा रहिवासी होता. "दोन्ही दहशतवादी एलईटीशी संबंधित होते. तरुणांना दहशतवादी गटात भरती करण्यात चकचा हात होता. त्यांच्याकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला," असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

दुसरी चकमक पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागातील हरदुमीर येथे झाली. या चकमकीत दोन अज्ञात अतिरेकी ठार झाले. शुक्रवारी, सुरक्षा दलांनी काश्मीरच्या (Kashmir) अनंतनाग जिल्ह्यात हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याला ठार केले. तो पोलीस कर्मचारी व नागरिकांच्या हत्येत सामील होता. जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) बडगाममध्ये एलईटी दहशतवाद्यांचे सहकारी असलेल्या दोन लोकांना अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT