Encounter In Kashmir  Dainik Gomantak
देश

Encounter in Kashmir: शोपियाँत एनकाऊंटरमध्ये 4 दहशतवाद्यांचा खात्मा

दोन ठिकाणी चकमक, जम्मू-काश्मिरमध्ये गेल्या ८ दिवसात ११ दहशतवाद्यांना कंठस्नान

गोमन्तक डिजिटल टीम

Encounter in Kashmir: जम्मू-काश्मिरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत चार स्थानिक दहशथवाद्यांचा सुरक्षायंत्रणांनी खात्मा केला. लष्करातर्फे जम्मू-काश्मिरात ऑपरेशन ऑलआऊट चालवले जात आहे.

शोपियाँ येथील द्राच भागात मंगळवारी सायंकाळी चकमकीस सुरुवात झाली होती. त्यात जेश-ए-मोहम्मद (JeM) चे तीन स्थानिक दहशतवादी मारले गेले हनान बिन याकूब आणि जमशेद अशी त्यातील दोघांची नावे आहेत. त्यांची ओळख पटली आहे. ते दोघेही पुलवामातील पिंगलाना येथील आहेत.

एसपीओ कर्मचारी आणि पश्चिम बंगालच्या मजुराच्या हत्येप्रकरणात दोघांचा सहभाग होता. द्राचमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस, सैन्यदल यांच्या संयुक्त पथकाने शोधमोहिम राबवली. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबारास सुरवात केली. प्रत्युत्तरात पथकाने केलेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला.

दरम्यान, बुधवारी मुलू येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा यंत्रणांनी लष्कर ए तोयबाच्या (LET) एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. मुलूमध्ये अद्यापही चकमक सुरु आहे.

यापुर्वी २ ऑक्टोबर रोजीही शोपियाँत बसकुचन इमामसाहिब भागात चकमकीत नसीर अहमद भट हा दहशतवादी मारला गेला होता. त्याच्याकडून एके ४७ रायफलसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला गेला होता.

गेल्या ८ दिवसात जम्मू-काश्मिरात ११ दहशतवादी मारले गेले आहेत. ३० सप्टेंबर रोजी सुरक्षारक्षकांनी बालामुला येथे जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. काश्मिर खोऱ्यात लष्कराचे सध्या ऑपरेशन ऑलआऊट सुरू आहे. कुलगाम जिल्ह्यात अहवातू येथे २७ सप्टेंबर रोजी जैशच्या दोघा दहशतवाद्यांचा खात्मा केला गेला होता. तर २६ सप्टेंबर रोजी बटपोरा भागातील दहशतवाद्यास मारले गेले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT