Home Ministry designate 10 Terrorist: 'हिजबुल', 'तोयबा'चे 10 जण दहशतवादी घोषित

केंद्रीय गृह मंत्रालयाची युएपीए अंतर्गत कारवाई; बहुतांश जण पाकिस्तानातून कार्यरत
Terrorist
Terrorist Dainik Gomantak
Published on
Updated on

केंद्रीय गृह मंत्रालयाने बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार (युएपीए) हिजबुल मुजाहिदीन, लष्कर ए तोयबा आणि इतर बंदी घातलेल्या संघटनांच्या एकूण 10 जणांना दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.

Terrorist
Pauri Bus Accident Update: पौरी गढवाल बस अपघातात 25 ठार, SDRF ने रातोरात 21 जणांची केली सुटका

गृह मंत्रालयाच्या अधिसुचनेमध्ये साजिद जट (पाकिस्तानी नागरीक), बासित अहमद रेशी (मूळचा बारामुला काश्मिर, सध्या राहणार पाकिस्तान), इम्तियाज अहमद कंडू उर्फ सज्जाद (मूळचा सोपोर, काश्मीर येथील पण सध्या राहणार पाकिस्तान), जफर इकबाल उर्फ ​​सली (मूळचा पुंछ येथील पण सध्या राहणार पाकिस्तान) आणि शेख जमील-उर-रहमान उर्फ ​​शेख़ साहब (राहणार पुलवामा) यांचा समावेश आहे. अहमद बेग उर्फ ​​बाबर (मूळ राहणार श्रीनगर, सध्या पाकिस्तानात), पुंछमधील रफिक नाई उर्फ सुलतान, डोडा येथील इरशाद अहमद उर्फ ​​इदरीस, कुपवाडातील बशीर अहमद पीर उर्फ ​​लम्तियाज आणि बारामूला येथील पण सध्या पाकिस्तानात राहणाऱ्या शौकत अहमद शेख उर्फ ​​शौकत मोची यांचाही या दहा जणांमध्ये समावेश आहे.

Terrorist
Kejriwal vs Saxena: दिल्लीकरांची मोफत वीज थांबवणार नाही, गुजरातमध्येही देऊ

केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, काश्मिर खोऱ्यात दहशतवादी कारवाया घडविणे, त्यासाठी युवकांना दहशतवादी संघटनांमध्ये सामिल करून घेणे, युवकांना कट्टरवादासाठी प्रोत्साहन देणे, यासाठी ही कारवाई केली गेली आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार ही कारवाई केली गेली आहे.

काश्मिर खोऱ्यातील शांततेसाठी करण्यात येत असलेल्या आणि दहशतवादाला समूळ उपटून टाकण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून याकडे पाहिले जात आहे. अलीकडच्या काळात पीएफआय या संघटनेच्या नेते, कार्यकर्त्यांवर झालेली कारवाईदेखील युएपीए कायद्यांतर्गत झालेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com