Cheetah Helicopter Crash: लष्कराचे चिता हेलिकॉप्टर अरूणाचल प्रदेशात क्रॅश, एका पायलटचा मृत्यू

दुसऱ्या पायलटवर रूग्णालयात उपचार, अपघाताचे कारण स्पष्ट नाही
Helicopter crash
Helicopter crash Dainik Gomantak

Cheetah Helicopter Crash: अरूणाचल प्रदेशातील तवांग परिसरात भारतीय सैन्य दलाचे चिता हे हेलिकॉप्टर कोसळून एका पायलटचा मृत्यू झाला आहे. लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव असे त्यांचे नाव आहे. सकाळी 10 च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

Helicopter crash
Home Ministry designate 10 Terrorist: 'हिजबुल', 'तोयबा'चे 10 जण दहशतवादी घोषित

नियमित निरिक्षणासाठी या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर दोन्ही पायलट्सना तातडीने जवळच्या सैन्य रुग्णालयात दाखल केले गेले. पण एका पायलटचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दुसऱ्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अपघाताची कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.

अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चिता या प्रकारातील हेलिकॉप्टर साठ वर्षांपासून भारतीय हवाई दलाच्या सेवेत आहेत. अनेकवेळा ही हेलिकॉप्टर रिप्लेस करण्याचे प्रयत्न झाले, पण त्यात यश आले नव्हते.

Helicopter crash
Nobel In Physics: क्वांटम इन्फर्मेशनवर संशोधन करणाऱ्या तिघा शास्त्रज्ञांना पदार्थविज्ञानाचे नोबेल

या वर्षी मार्चमध्येही जम्मू आणि काश्मिरमध्ये एलओसीजवळ चिता हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. तसेच गतवर्षी सीडीएस बिपिन रावत यांचेही हेलिकॉप्टर तामिळनाडूत क्रॅश झाले होते. ते एमआय-17 व्ही 5 या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. त्यता त्यांच्यासह त्यांची पत्नी आणि आणखी 12 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com