Representative Image Dainik Gomantak
देश

मुलगाच ठरला वैरी; जन्मदात्या आईवर केला बलात्कार

बरवानी जिल्ह्यात घडलेल्या या घटनेत महिला तिच्या घरी झोपली होती आणि तिचा अपंग पती घराबाहेर गेला होता, त्याचवेळी महिलेच्या हे कुकर्म कर्म केले.

दैनिक गोमन्तक

मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) बरवानी जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ज्यामुळे आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासली गेली आहे. बरवानीच्या सेंधवा ग्रामीण पोलीस (Police) स्टेशन परिसरातील सुराणी गावात, पोलिसांनी 45 वर्षीय महिलेला तिच्या 30 वर्षांच्या मुलावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. 2 सप्टेंबरला घडलेल्या या घटनेने परिसरातील लोक हादरुन गेले आहेत.

बरवानी जिल्ह्यात घडलेल्या या घटनेत महिला तिच्या घरी झोपली होती आणि तिचा अपंग पती घराबाहेर गेला होता. महिलेचा मोठा मुलगा कालू हा देखील आपल्या तीन मुलांसह तिच्यासोबत राहत होता. कालू रविवारी रात्री आईकडे आला आणि तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्याच्या आईने त्याला थांबण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने थेट आपल्या आईच्या गळ्यावर चाकू लावून जीवे मारण्याची धमकी दिली आपली वासनेची भूक भागवली.

सेंधवा ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दिनेश चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरानी गावातील 45 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून महिलेच्या मोठ्या मुलाला सोमवारी रात्री अटक करण्यात आली. त्यांनी महिलेच्या तक्रारीचा हवाला देत सांगितले की, ही घटना रविवारी रात्री घडली आहे. विशेष म्हणजे आरोपीचा सात वर्षांचा मुलगा या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी आहे, मात्र त्याने भीतीपोटी काहीही सांगितले नाही.

दरम्यान, या प्रकरणात महिला आरोपींच्या तावडीतून पळून गेल्यानंतर, तिने तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधला आणि त्यांना संपूर्ण प्रकरण सांगितलं. त्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाविरुद्ध आरोपीविरोधात भा.दं.वि.च्या कलम 376 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर सोमवारी रात्री आरोपीला अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

साखळीतील किल्ल्याचं काम पूर्णत्वास, फेब्रुवारीच्या अखेरीस उद्घाटन; CM प्रमोद सावंतांची माहिती

Rohit Sharma: "अजीब लग रहा है इधर..." वानखेडेवर टीम इंडियाचा ड्रेसिंग रूम पाहून 'मुंबईचा राजा' भावूक Watch Video

मौर्य सम्राट चंद्रगुप्ताने आपले सिंहासन सोडले होते आणि भद्रबाहूसोबत श्रवणबेळगोळच्या टेकडीवर गेला; भगवान गोमटेश्वराचा शिलालेख

Salt Pan Preserve: गोव्याच्या 'मिठागरांना' नवसंजीवनी! राज्य सरकारकडून 95 लाखांची तरतूद, 75 शेतकर्‍यांना मिळणार थेट लाभ

कोकणातल्या चाकरमान्यांना 'लालपरी'चा आधार; 'शिमगोत्सवासा'ठी मुंबई–कोकण मार्गावर जादा गाड्या धावणार, येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT