INS Tarkash intercepted the narcotics PIB
देश

Indian Navy: हिंद महासागरात 2,000 कोटी किंमतीचे अमली पदार्थ जप्त; INS Tarkash ची मोठी कारवाई

INS Tarkash Action: सागरी कमांडोंसह विशेष पथकाने संशयास्पद नौकेवर शोधमोहीम राबवली असता यामध्ये विविध बंद पाकिटे आढळली.

Pramod Yadav

पणजी: हिंद महासागरात दोन हजार कोटी किंमतीचे २,५०० किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आयएनएस तर्कष या भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडअंतर्गत कार्यरत आघाडीच्या युद्धनौकेने ही कारवाई केली. या कारवाईमुळे भारतीय नौदलाची सागरी गुन्हेगारीविरुद्ध लढण्याची व क्षेत्रिय सुरक्षा बळकट करण्याची अतूट वचनबद्धता अधोरेखित होते. ३१ मार्च रोजी कारवाई करण्यात आली.

गस्तीवर असताना आयएनएस तर्कष युद्धनौकेला P8I या भारतीय नौदलाच्या विमानाकडून त्या भागातील संशयास्पद नौकांची माहिती मिळाली. या नौका अमली पदार्थांच्या तस्करीसह अन्य बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असल्याची माहिती मिळाल्यानंतर तर्कष युद्धनौकेने आपला मार्ग बदलून संशयास्पद नौकांच्या मार्गात प्रवेश केला.

आसपासच्या सर्व संशयित नौकांची तपासणी केल्यानंतर मुंबईतील सागरी कारवाई केंद्र आणि P8I विमानाच्या समन्वयाने तर्कषवरील अधिकाऱ्यांनी एका संशयित नौकेवर प्रवेश केला.

सागरी कमांडोंसह विशेष पथकाने संशयास्पद नौकेवर शोधमोहीम राबवली असता यामध्ये विविध बंद पाकिटे आढळली. नौकेच्या वेगवेगळ्या कप्प्यांत २,५०० किलोपेक्षा जास्त अमली पदार्थ (२,३८६ किलो हशीश व १२१ किलो हेरोइन) सापडले.

जानेवारी २०२५ मध्ये सागरी सुरक्षेसाठी हिंद महासागराच्या पश्चिम क्षेत्रात तैनात करण्यात आलेली आयएनएस तर्कष ही युद्धनौका संयुक्त कृती दल (CTF) १५० या पथकाला सक्रिय मदत करते. CTF हा संयुक्त सागरी सुरक्षा दलाचा एक भाग असून त्याचा तळ बहारिनमध्ये आहे. ही युद्धनौका ऍन्झॅक टायगर या बहुराष्ट्रीय संयुक्त उद्देश लष्करी मोहीमेत सहभागी झाली आहे.    

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 'गोवा, मुंबईत ड्रग्ज वापरले'! रायपूरमधील 2 महिलांची कबुली; इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून टेक्नो पार्ट्यांचे आयोजन

Goa Politics: खरी कुजबुज; हे नगरसेवक आहेत कुठे?

BITS Pilani: गोव्‍यातीलच 'बिट्‌स' कॅम्‍पसमध्‍ये मृत्‍यू का होतात? युवा काँग्रेसची निदर्शने, सखोल चौकशीची आपची मागणी

Colvale Jail: कोलवाळ कारागृहात छापा! 8 मोबाईलसह तंबाखू हस्तगत; तुरुंगातील रामभरोसे कारभार उघड

Advalpal: ‘तुम्‍ही करोडो कमावता, आम्‍हाला का नागवता?’ अडवलपालमधील जमीनमालकाचा खाण कंपनीला संतप्‍त सवाल

SCROLL FOR NEXT