12 Minute 46 Second MMS Video Dainik Gomantak
देश

एक क्लिक अन् बँक खातं रिकामं! '12 मिनिटे 46 सेकंद'चा 'तो' MMS व्हिडिओ करु शकतो तुम्हाला कंगाल; सायबर चोरांचा मोठा सापळा

12 Minute 46 Second MMS Video: इंटरनेटवर सध्या '12 मिनिटे 46 सेकंद' या नावाचा एक कथित एमएमएस व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

Manish Jadhav

12 Minute 46 Second MMS Video: इंटरनेटवर सध्या '12 मिनिटे 46 सेकंद' या नावाचा एक कथित एमएमएस व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडिया आणि सर्च इंजिनवर या विशिष्ट वेळेचा उल्लेख करुन लोकांना व्हिडिओ पाहण्याचे प्रलोभन दिले जात आहे. मात्र, हा कोणताही खाजगी व्हिडिओ नसून सामान्य नागरिकांची बँक खाती रिकामी करण्यासाठी सायबर चोरांनी रचलेला हा एक मोठा सापळा आहे.

काय आहे हे '12 मिनिटे 46 सेकंद'चे प्रकरण?

गुगल सर्च किंवा सोशल मीडिया (Social Media) स्क्रोल करताना तुम्हाला अनेकदा असे भडक कॅप्शन दिसतील, ज्यामध्ये 'लीक झालेला एमएमएस' पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करण्याचे आवाहन केले जाते. थंबनेलमध्ये दोन अस्पष्ट व्यक्ती किंवा एखादी सावली दाखवून लोकांची उत्सुकता वाढवली जाते. इंस्टाग्राम स्टोरीज, टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपवर हे लिंक्स मोठ्या प्रमाणावर पसरवले जात आहेत. मात्र, या लिंकच्या मागे कोणताही खाजगी व्हिडिओ नसून केवळ धोकादायक व्हायरस आणि मालवेअर लपलेले असतात.

क्लिक करताच काय होते?

जेव्हा एखादी व्यक्ती उत्सुकतेपोटी या लिंकवर क्लिक करते, तेव्हा तिथे कोणताही व्हिडिओ दिसत नाही. त्याऐवजी, एक नवीन फाईल डाऊनलोड करण्याचा पर्याय येतो किंवा मोबाईल अचानक हँग होतो. अनेक प्रकरणांमध्ये असे दिसून आले की, लिंकवर क्लिक केल्यावर वापरकर्त्याच्या फोनवर एक ओटीपी येतो. हा ओटीपी चुकून शेअर केला किंवा त्या लिंकवर कोणतीही माहिती भरली, तर काही क्षणांत तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. याव्यतिरिक्त, तुमच्या फोनमधील खाजगी फोटो, कॉन्टॅक्ट्स आणि सोशल मीडिया अकाउंट्स देखील हॅक होण्याचा मोठा धोका उद्भवू शकतो.

व्हिडिओच्या नावाखाली केवळ फसवणूक

तपासणीअंती असे समोर आले की, या 12 मिनिटे 46 सेकंदांच्या लिंकमध्ये कोणाचाही खाजगी व्हिडिओ नाही. काही लिंक्सवर क्लिक केल्यावर केवळ रेसिपीचे व्हिडिओ, ट्रॅव्हल ब्लॉग्स किंवा एआयद्वारे तयार केलेली बनावट चित्रे दिसतात. सायबर गुन्हेगार केवळ 'व्हायरल' कीवर्डचा वापर करुन लोकांना जाळ्यात ओढत आहेत. यापूर्वीही '9 मिनिटे 44 सेकंद' किंवा '3 मिनिटे' अशा नावांनी लोकांची फसवणूक (Fraud) करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT