Viral News 
देश

Viral News: 11 लाख कोटी जमा; बेरोजगार युवकाच्या खात्यात जमा झाली 14 अंकी रक्कम, बँकेत चौकशी करताच झाला भ्रमनिरास

Uttar Pradesh News: दिलीपने गेल्या दोन महिन्यापूर्वीच एका खासगी बँकेत खाते उघडले होते. दिलीप अनाथ असून, त्याला आई – वडील नाहीयेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

उत्तर प्रदेश: हाताला काम नसताना अचानक तुमच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा झाले तर? सहाजिकच कोणालाही आनंदच होईल. डिजिटल युगात फसवेगिरीला ऊत आले आहेच पण काही चमत्कारीक घटना देखील उघडकीस येतायेत.

दनकौरमध्ये २० वर्षीय युवकाच्या बँक खात्यात तब्बल ११ लाख कोटी रुपये जमा झाले. १४ अंकी आकडा पाहून बेरोजगार युवकाचा आनंद गगनात मावेनासा झाला पण, थोड्याच वेळात त्याचा भ्रमनिरासही झाला.

दनकौर येथील दिलीप या २० वर्षीय युवकाच्या बँक खात्यात ११.१३ लाख कोटी रुपये जमा झाले. दिलीपला पैसे जमा झाल्याचा मेसेज मिळताचा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. बेरोजगार असलेला तरुण मेसेज पाहून तत्काळ चौकशीसाठी बँकेत दाखल झाला. चौकशीअंती मात्र त्याचा भ्रमनिरास झाला.

बँकेत चौकशी केली असता बँकेने दिलीपला तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करत चुकून त्याच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे सांगितले. नवी युपीआय या मोबाईल अप्लिकेशनमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने हा प्रकार घडल्याचे त्याला सांगण्यात आले. शिवाय त्याच्या खात्यात शून्य शिल्लक असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले.

सध्या ही घटना सोशल मिडियावर वाऱ्यासारखी व्हायरल झाली असून, नेटकऱ्यांनी यावर खुमासदार चर्चा सुरु केली आहे. दिलीपने गेल्या दोन महिन्यापूर्वीच एका खासगी बँकेत खाते उघडले होते. दिलीप अनाथ असून, त्याला आई – वडील नाहीयेत, अशी माहिती एक इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: “एक आडवा न तिडवा खड्डा चंद्रावाणी पडला गं…”; मुंबई-गोवा महामार्गाच्या दुर्दशेवर इन्फ्लुएन्सरने मांडली व्यथा VIDEO

शारदीय नवरात्रीतून मिळतायत 'हे' शुभसंकेत, देवीचे वाहन ठरवणार तुमचं भाग्य; वाचा संपूर्ण माहिती

Mumbai Goa Highway Traffic: गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासात कोकणवासीयांची कोंडी, मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामांमुळे त्रस्त

Chandra Grahan 2025: वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण! दिसणार 'ब्लड मून'चा थरार; जाणून घ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी

त्यावेळी कोळसा प्रदूषणात वाढ होणार हे माहीत नव्हते का? रेल्वे दुपदरीकरणाचा DPR काँग्रेसच्या काळात; ढवळीकरांचा घणाघात

SCROLL FOR NEXT