10K Condoms Ordered in a Year by a Single Customer on Blinkit Dainik Gomantak
देश

एकाच ग्राहकाने वर्षभरात मागवले 10K Condoms, 2023 मध्ये ऑनलाइ शॉपिंगमध्ये मॅगी, लायटरची चलती

Blinkit: कंपनीच्या म्हणण्यानुसार, यावर्षी सुमारे 30,02,080 पार्टी स्मार्ट टॅब्लेट (मद्यपान केल्यानंतर सकाळी हँगओव्हर टाळण्यासाठी) वितरित केले गेले.

Ashutosh Masgaunde

10K Condoms Ordered in a Year by a Single Customer on Blinkit, Demand for Maggi, Lighter was high in Online Shopping in 2023:

ऑनलाइ शॉपिंग प्लॅटफॉर्म ब्लिंकिटचे संस्थापक अल्बिंदर धिंडसा यांनी X वर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले की, 2023 ला निरोप देताना, एका व्यक्तीने एकाच वेळी त्याच्या घरी 81 कंडोम मागवले. तथापि, ते म्हणाले की, ग्राहकाने हे कंडोम स्वतःच्या वापरासाठी ऑर्डर केले की सेक्स वर्कर्सना वितरित करायचे हे स्पष्ट झाले नाही.

धिंडसा यांनी उघड केले की, 2023 च्या शेवटच्या दिवसांमध्ये शॉट ग्लासेस, लिंबू आणि कारले यासह अनेक उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली होती.

याव्यतिरिक्त, ब्लिंकिटच्या संस्थापकाने उघड केले की, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला लोकांना दोन दशलक्षाहून अधिक शीतपेये वितरित केली गेली. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कारल्याशिवाय भुजिया, शेंगदाणे आदी खाद्यपदार्थही लोकांनी मागवले.

10 हजार कंडोम्स

ब्लिंकिटचे संस्थापक धिंडसा यांच्या आणखी एका पोस्टनंतर इंटरनेटवर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ब्लिंकिटच्या माध्यमातून खरेदीशी संबंधित डेटामधून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

2023 च्या डेटावरून असेही समोर आले आहे की, दिल्लीतील एका व्यक्तीने वर्षभरात सुमारे 10,000 कंडोम खरेदी केले होते. त्याने एकूण 9,940 कंडोम ऑर्डर केले.

६५ हजारांहून अधिक लाइटर्सची विक्री

'ब्लिंकिट ट्रेंड्स 2023' नुसार, 2023 मध्ये गुरुग्राममध्ये 65,973 लाइटर्सची ऑर्डर देण्यात आली होती.

याशिवाय सॉफ्ट ड्रिंक्सपेक्षा जास्त टॉनिक वॉटर (Carbonated Drinks) ऑर्डर करण्यात आले होते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यावर्षी सुमारे 30,02,080 पार्टी स्मार्ट टॅब्लेट (मद्यपान केल्यानंतर सकाळी हँगओव्हर टाळण्यासाठी) वितरित केले गेले.

त्याच वेळी, बेंगळुरूमधील एका व्यक्तीने iPhone 15 Pro Max, Lay's चे एक पॅकेट आणि 1,59,900 रुपये किमतीची सहा केळी ऑर्डर केली.

तीन कोटींहून अधिक मॅगी पाकेट्सच्या ऑर्डर्स

ब्लिंकिटद्वारे वर्षभरात मध्यरात्रीनंतर सुमारे 3,20,04,725 मॅगीची पाकिटे वितरित करण्यात आली. तर एका ग्राहकाने एका ऑर्डरमध्ये 101 लिटर मिनरल वॉटर ऑर्डर केले. यावर्षी सुमारे 80,267 गंगाजल बाटल्यांची ब्लिंकिटद्वारे डिलिव्हरी करण्यात आली.

ब्लिंकिटच्या मते, 2023 मध्ये सकाळी 8 वाजेपूर्वी सुमारे 3,51,033 प्रिंटआउट्स वितरीत करण्यात आल्या होत्या, तर 1,22,38,740 आईस्क्रीम आणि 8,50,011 आइस क्यूब पॅकेटसह 45,16,490 एनो पाऊच देखील ग्राहकांनी ऑर्डर केले होते.

हैदराबादमध्ये एका व्यक्तीने 2023 मध्ये 17,009 किलो तांदूळ ऑर्डर केला. ब्लिंकिटच्या मते, एका ग्राहकाने एका महिन्यात 38 अंडरवेअर ऑर्डर केले. तर दुसऱ्या एका ग्राहकाने ९७२ मोबाईल चार्जर मागवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT