वाल्मिकी फालेरो
झुइट अभ्यागत फादर अलेस्सांद्रो व्हॅलिग्नॅनो यांनी १५७६साली मडगावमध्ये एक मोठे कॉलेजिओ आणि पॅरोकियल हाउस बांधण्याचे आदेश दिले.
गोव्यात येणाऱ्या नवीन जेझुइट्ससाठी त्यांनी जुने गोवे येथून मुख्य कोकणी भाषा असलेली शाळा मडगाव येथे स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आणि चर्चच्या शेजारी कॉलेजिओ परिसर बांधण्याचे निर्देश दिले.
मडगावमध्ये कोलेजिओ दा एस्पिरितो सांतो आणि संबंधित संस्था पुन्हा सुरू झाल्यानंतर अवघ्या चार वर्षांनी, विजापुरी लोकांनी १५७९साली गावावर पुन्हा हल्ला केला आणि जेझुइट्सना चर्च, कॉलेजिओ आणि संस्थांचा त्याग करण्यास भाग पाडले.
ख्रिस्ती न झालेल्या हिंदूंच्या सहाय्याने मुस्लिमांनी मडगावमधील जेझुइट्स वस्ती जमीनदोस्त केली. मडगाव हे राहण्यास धोकादायक व असुरक्षित बनले.
त्यामुळे, १५८०साली कॉलेजिओला तटबंदी असलेल्या राशोल येथे स्थलांतरित करण्यात आले. या वर्षी व्हाइसरॉय लुईझ डी अथेडे यांनी कॉलेजिओ आणि त्याच्या संलग्न संस्थांना वार्षिक देणगीही दिली.
१५८० ते १५८५ या कालावधीत राशोल येथील अवर लेडी ऑफ स्नोज मदर चर्चजवळ कॉलेजिओसाठी नवीन इमारत बांधली जात असताना, १५८२साली कॉलेजिओ पुन्हा मडगावला हलवण्यात आले.
राशोल येथे व्हाईसरॉय आंताओ द नोरोन्हा (१५७१-७३) यांनी सांता पाउलोच्या याजकांसाठी काही घरे दान दिली होती. त्याच घ्ररांच्या जागेवर ही कॉलेजिओची इमारत बांधली गेली. १५८५साली बांधकाम पूर्ण झाल्यावर कॉलेजिओ पुन्हा मडगावहून राशोल येथे हलवण्यात आले.
नवीन जागा अपुरी पडत असल्याचे आढळून आल्यानंतर १५८९/९०मध्ये भारताच्या जेझुइट प्रांताच्या तिसऱ्या फळीतील सदस्यांनी कॉलेजिओला परत मडगावला हलवण्याबाबत किंवा मडगावची जागा विकून पूर्णपणे नवीन ठिकाणी कॉलेजिओ स्थलांतरित करण्याबाबत चर्चा केली.
२१ ऑक्टोबर १५८२ रोजी कॅस्टिलियनमध्ये (१५८० ते १६४० दरम्यान पोर्तुगालवर राज्य करणाऱ्या स्पॅनिश राज्यकर्त्यांची कॅस्टिलियन ही अधिकृत न्यायालयीन कामकाजाची भाषा होती. स्पेनच्या बास्क, कॅटालोनियन, व्हॅलेन्सियन, गॅलेको-पोर्तुगीज आणि लिओनीजसारख्या विविध भाषांमधील कॅस्टिलियन ही एक भाषा आहे.
वास्तविक ही भाषा स्पेनमधून फार पूर्वी गायब झाली होती. परंतु कॅस्टिलियन ही मिरांडससह पोर्तुगालची दुसरी अधिकृत भाषा आहे.) लिहिलेल्या वार्षिक पत्रात, रुई व्हिसेंट यांनी नमूद केल्याप्रमाणे, सासष्टीतील ख्रिश्चनांची संख्या ८,००० होती.
त्यांच्यासाठी हॉस्पिटल, कॅटेचुमेनेट, अनाथांसाठी एक सेमिनरी आणि सहा चर्च यांचे व्यवस्थापन १२ जेझुइट्स करत होते. त्यांनी पुढे म्हटले की, हिंदूंच्या उठावामुळे आणि नंतर विजापूरच्या मुस्लिमांसोबत युद्धामुळे शेतजमिनी नष्ट झाल्या, चर्च जाळल्या गेल्या आणि संपूर्ण कॉलेजिओ जमीनदोस्त झाले(१५७९साली). चर्चची नंतर पुनर्बांधणी करण्यात आली.
१५९७साली जेझुइट अभ्यागत, फादर निकोलॉ पिमेंटा यांच्या आदेशानुसार कॉलेजिओ पुन्हा मडगाव येथे हलविण्यात आले. १५९७साली कॉलेजिओच्या बांधकामासाठी नवीन परिसर निवडण्यात आला. आज होली स्पिरिट इन्स्टिट्यूट जिथे उभे आहे, तिथे ही जागा असावी असा अंदाज आहे.
कारण १५७९पासून चर्च त्याच्या सध्याच्या ठिकाणी आहे. एक हॉल, याजकांसाठी शयनकक्ष (क्युबिक्युले किंवा डॉर्मिटरीज), सुरक्षितता व एकांत यासाठी एक कुंपण, एक टेरेस, एक स्वयंपाकघर आणि स्कलरी/गॅली आणि बागेचे कुंपण बांधले गेले.
स्थानिक भाषा शिकण्यासाठी दहा-बारा जेझुइट्सचे येथे राहत होते. कॉलेजिओने स्थानिकांसाठी सेमिनरी म्हणूनही काम केले. त्यात आधीपासूनच सुरू असलेले(१५७७), पोर्तुगीज विद्यार्थ्यांसाठी एक बोर्डिंग स्कूल, ४० मुलांची क्षमता असलेला एक अनाथाश्रम आणि कॅटेचुमेनेट (१५७५ मध्ये आधी स्थापन झालेले) होते.
२४ ऑक्टोबर १५७९ रोजी गोव्यात आल्यावर सासष्टीत नेमणूक झालेले ब्रिटिश जेझुइट फादर थॉमस स्टीफन्स, त्याच वर्षी ६ डिसेंबर रोजी आपल्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात की, ‘सासष्टीच्या ख्रिश्चनांमध्ये मला चार वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी दिसतात.
पहिली, मडगावची ही लोकसंख्या संपूर्णपणे ख्रिश्चन ब्राह्मणांची आहे. त्यांची मुले अतिशय हुशार आणि सुव्यवस्थित आहेत. शिक्षणाचे प्रमाणही त्यांच्यात खूप आहे’.
१६०१साली रोममधील त्यांच्या मुख्यालयाला लिहिलेल्या पत्रात फादर स्टीफन्स यांनी सासष्टीत निवासी याजकांच्या कमतरतेची तक्रार केली आहे. त्यांनी चर्च कॉम्प्लेक्स आणि मडगावच्या ख्रिश्चन समुदायाबद्दलही काही विशेष गोष्टी नोंदवल्या आहेत, ज्यांनी मडगाव चर्चमध्ये सासष्टीतील याजकांसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
चर्चला जोडलेली शाळा मुलांनी भरलेली असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्याआधी सुमारे सहा वर्षांपूर्वी, १५९५मध्ये, मुलबॉअर यांनी मडगाव चर्च शाळेत १,४०० विद्यार्थी असल्याचे पत्र लिहिले होते.
१६०६ मध्ये मराठ्यांच्या सुरुवातीच्या हल्ल्यानंतर मडगावमधील कॉलेजिओ हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला स्थानिक याजक आणि सामान्य लोकांकडून कडाडून विरोध झाला. मडगाव चर्चची मुख्य संघटना व होली स्पिरिटचे वॉर्डन यांनी सांगितले की, ‘स्थलांतर केल्यास लोकांचा विश्वास कमी होईल’.
अशी भीती होती की महसूल (चर्च संग्रह) कमी होईल. ‘ज्या राशोलमध्ये आपण जन्मलो तेथील जमिनी, घरे सोडून येथे आलो आणि आता येथे स्थायिक झाल्यावर कॉलेजिओ तिथे हलवणे चुकीचे आहे’, असे मत मडगावच्या सामान्य ख्रिस्ती लोकांनी मांडले.
कोलेजिओ दा देउश एस्पिरितो सांतोची स्थापना राशोल येथे कोलेजिओ दा नोसा सेनोरा दास नेव्हेस म्हणून करण्यात आली. कॉलेजिओच्या इमारतीची पुनर्बांधणी १६०६साली सुरू झाली आणि १६१०साली ही इमारत फादर गॅसपर सोरेस यांनी पूर्ण केली.
या इमारतीच्या बांधकामावर बराच विचार करण्यात आला आणि या कामासाठी दोन उत्कृष्ट वास्तुविशारद नेमले गेले - १६०६साली गोव्याचे लुइस कास्टॅनहो (ज्यांनी १५८८च्या सुमारास जुने गोवे येथील प्रोफेस्ड हाऊसवर काम केले होते) आणि १६०८ पर्यंत पोर्तुगीज जेसुइट-आर्किटेक्ट आंतोनिओ मॅग्नो.
(ज्यांनी दीवमधील प्रोफेस्ड हाउस पूर्ण केले होते). मॅन्युएल डायस या पोर्तुगीज कारागिराला १६१८मध्ये गवंडी म्हणून काम देण्यात आले. कोलेजिओ डी नोसा सेन्होरा दास नेव्हसचे पहिले प्रमुख होते, जेसुइट फादर लुईस गोस.
कॉलेजिओला ऑल सेंट्स कॉलेज (टोडोस ओस सँटोस) हे त्याचे मूळ नाव नंतर देण्यात आले. यात संत उर्सुला आणि अकरा हजार कुमारिका आणि त्यांच्या पुरुष समकक्षांच्या अनेकांच्या अवशेषांची भव्य सजावट केली होती.
जेसुइट संस्थापक १६२२मध्ये कॅनोनाइज्ड झाल्यानंतर ऑल सेंट्स कॉलेजचे पुन्हा कोलेजिओ दा सांतो इग्नासिओ (लोयोला कॉलेजचे सेंट इग्नेशियस) असे नामकरण करण्यात आले. १७६२पासून पैतृक सेमिनरी (डायोसेशनची मुख्य सेमिनरी)अशी कॉलेजिओची ओळख निर्माण झाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.