Serendipity Festival 2025: सेरेंडिपीटीत अवतरणार महाकाय नरकासुर! 5 वेगवेगळ्या ठिकाणी मिळणार पाहायला; संपूर्ण माहिती जाणून घ्या..

Serendipity Arts Festival Narkasur: गोव्यात नरक चतुर्दशीच्या रात्री जाळल्या जाणाऱ्या नरकासुराच्या प्रतिमांनी, विशेषता पणजीतील, अलीकडच्या काळात अक्राळविक्राळ काल्पनिक जीवांचे आकार धारण केलेले दिसतात.‌
Serendipity Arts Festival 2025
Serendipity Arts Festival 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात नरक चतुर्दशीच्या रात्री जाळल्या जाणाऱ्या नरकासुराच्या प्रतिमांनी, विशेषता पणजीतील, अलीकडच्या काळात अक्राळविक्राळ काल्पनिक जीवांचे आकार धारण केलेले दिसतात.‌ कधी ड्रॅगन तर कधी प्रचंड सुळे असलेल्या आकृतीच्या रूपातून हे नरकासुर अवतरतात.‌

नरकासुरांच्या या प्रतिमांना दीप्तेज वेर्णेकर हा प्रसिद्ध इन्स्टॉलेशन कलाकार आणखीनही आगळे रूप देऊन येत्या सरेंडिपीटी कला महोत्सवात सादर करणार आहे. अलीकडच्या काळात शोध लावले गेलेले काही जीव नरकासुराच्या रूपाने पाहण्याची संधी तो उपस्थितांना देणार आहे. 

अलीकडेच गोव्यातील भगवान महावीर अभयारण्यात एक दुर्मिळ मुंगीची प्रजाती सापडली आहे. त्याचप्रमाणे चतुरच्या (कोकणीत भिरभुट तर इंग्रजीत ड्रॅगन फ्लाय) एका नवीन प्रजातीचा शोध देखील लागलेला आहे.

या दोन्हीची सरमिसळ करून दीपतेजने एक नवीन राक्षस तयार केलेला आहे. त्याचबरोबर आज नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या ‘खवले मांजर’ या प्राण्याच्या रूपाने त्याने आणखीन एक अवाढव्य राक्षसाची कल्पना केली आहे. त्याच अभयारण्यात सापडणाऱ्या फ्लाईंग लिझार्डला देखील त्याने महाकाय नरकासुराचे रूप दिले आहे. 

या सरेंडिपीटी कला महोत्सवात नरकासुर या संकल्पनेवर आधारलेले दोन प्रकल्प दीप्तेजचे सादर करणार आहे.

दीप्तेज म्हणतो, ‘सध्या गोव्यात ज्या नरकासुर प्रतिमा आम्हाला दिसतात त्या मूळ नरकासुरासारख्या अजिबात राहिलेल्या नाहीत. त्या जणू अख्यायिकेतून उतरलेल्या असतात. केवळ त्या 'नरकासुर' म्हणून लोकांपुढे आणल्या जातात या कारणामुळे लोक त्यांना नरकासुर मानतात. ही एक प्रकारची नरकासुराची होत जाणारी उत्क्रांती आहे, त्याचबरोबर ती एक सर्जनशील प्रक्रिया देखील आहे. नरकासुराचे रूप दरवर्षी कलात्मकपणे बदलत जात आहे हेच त्याचे सुंदर वैशिष्ट्य आहे.'

Serendipity Arts Festival 2025
Serendipity Art Festival: क्ले‌ प्ले, मोटाऊन मॅडनेस, रिफ्लेट! 'सेरेंडिपीटी'त अनुभवा जादुई सादरीकरणे

दिप्तेज आपल्या या सादरीकरणात पर्यावरणासंबंधीदेखील एक सुप्त टिप्पणी देखील सादर करतो. उदाहरणार्थ, खाडीच्या किनाऱ्यावर असलेल्या गोव्यातील एका गावात होणाऱ्या, 'मानगे थापणे' या विधीत पाण्यातील पशुचे एक प्रकारे केले गेलेले 'ग्लोरीफिकेशन' त्याच्या या प्रकल्पाचा भाग आहे..  दीप्तेजने अशाप्रकारे जैवविविधतेलाही आपल्या या निर्मितीत स्थान दिले आहे. जीभ बाहेर काढून असलेला बेडूकरुपी राक्षस एक सौम्य राजकीय उपहासिकेचे उदाहरण म्हणून तो सादर करतो. 

Serendipity Arts Festival 2025
Serendipity Arts Festival: बहुविध कलांचा मोठा महोत्सव! 'सेरेन्डिपिटी'साठी सजतेय पणजी; जगभरातील कलाकार-प्रेक्षक येणार एकत्र

पणजीतील पाच वेगवेगळ्या ठिकाणी दीप्तेजचे हे नरकासुर आपल्याला पाहायला मिळतील. पाटो येथील जुनी पीडब्ल्यूडी इमारत, जुनी जीएमसी इमारत, योग सेतू या ठिकाणी हे महाकाय नरकासुर उभे असतील तर चार ते पाच फूट उंचीचे मिनी नरकासुर आपल्याला आपल्याला जुन्या लेखा संचालनालयाच्या इमारतीत पाहायला मिळतील. नरकासुर निर्मितीतील उत्तर तसेच दक्षिण गोव्याचे वेगवेगळे सौंदर्यशास्त्रही आपल्याला नरकासुरांच्या एकत्रित मांडणीत पाहायला मिळेल. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com