

सासष्टी: मडगाव व म्हापसा या दोन्ही ठिकाणच्या बस स्टॅण्ड बांधकाम प्रक्रिया सुरू झाली आहे. हल्लीच या बसस्टॅण्ड सार्वजनिक खासगी भागीदारीवर बांधकामाची जबाबदारी घेण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांकडे संबंधित सरकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन चर्चा केली असे कळते. या बैठकीला सात बांधकाम कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते असे सांगण्यात आले.
म्हापसा येथील बस स्टॅण्ड बांधकामासाठी अंदाजे १९२ तर मडगावसाठी अंदाजे २५१ कोटी रुपया खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. आता पुढील काही दिवसांत या कामाबद्दलच्या निविदा जाहीर होतील व बांधकाम कामाची माळ नेमक्या कोणत्या कंपनीच्या गळ्यात पडते ते पहावे लागेल.
या दोन्ही बस स्टॅण्डच्या नुतनीकरणाची, पुर्नबांधकामाची, दुरुस्तीची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होत आहे. या दोन्ही बस स्टॅण्डवरील सार्वजनिक सुविधा कोलमडलेल्या अवस्थेत आहेत. योग्य शौचालय, बसण्याची किंवा पावसाळ्यात प्रवाशांसाठी योग्य सुविधांचा अभाव या दोन्ही बस स्टॅण्डवर दिसत आहे.
म्हापसा बस स्टॅण्डसाठी २७ हजार चौरस मीटर तर मडगाव बस स्टॅण्डसाठी ४६ हजार चौरस मीटर जागेचा विकास करणे आवश्यक आहे.
म्हापसा बस स्टॅण्डवर एकूण ७०० वाहने पार्क करण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यात ५०० दुचाकी व २०० चार चाकी वाहनांचा समावेश करण्यात येईल. मडगाव बस स्टॅण्डवर ८०० वाहने ठेवण्याची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव आहे. त्यात ५५० दुचाकी, १५० चार चाकी तसेच कर्मचाऱ्यांच्या वाहनासाठी पार्किंग व्यवस्थेचा समावेश आहे.
जो कोण या बस स्टॅण्डची जबाबदारी घेईल, त्याला ऑपरेशन कालावधी केवळ बस स्थानकासाठी ३३ वर्षे व व्यापारी संकुलासाठी ५७ वर्षांचा असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दोन्ही ठिकाणी व्हाय फाय सुविघा, वातानुकूलन विश्रांती कक्ष, शौचालय, रेस्टॉरंट, महिलांसाठी खास कक्ष, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हीलचेअर, साहित्याची ट्रॉली, एटीएम सारख्या सुविधा उपलब्ध केल्या जातील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.