

Arpora nightclub owner reaction: गोव्यातील हडफडे येथील 'बर्च बाय रोमियो लेन' या नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर क्लबचा मालक सौरभ लुथरा याने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या घटनेवर गहन दुःख आणि तीव्र शोक व्यक्त करत लुथरा याने पीडित कुटुंबांसोबत अढळ एकजुटीने उभे राहण्याची ग्वाही दिली आहे.
क्लबचे मालक सौरभ लुथरा यांनी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटले आहे की, "बर्च येथे झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल व्यवस्थापन दुःख व्यक्त करते आणि आम्ही देखील हादरून गेलो आहोत. भरून न येणाऱ्या या दुःखाच्या आणि जबरदस्त त्रासाच्या या क्षणी, व्यवस्थापन मृतांच्या तसेच जखमींच्या कुटुंबियांसोबत अढळ एकजुटीने उभे आहे आणि मनःपूर्वक संवेदना व्यक्त करते."
आग लागलेल्या नाईट क्लबचा मालक सौरभ लुथरा आहे. तो रोमियो लेन चेनचा संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहे. सौरभ इंजिनिअरिंगनंतर व्यवसायात उतरला होता. त्याने बर्च, रोमियो लेन, मामाज बुओई यांसारखे ब्रँड लाँच केले आहेत. भारतात त्याला ५० रेस्टॉरंट सुरू करायची होती. तो गोल्ड मेडलिस्ट इंजिनिअर आहे.
सध्या रोमियो लेनचा व्यवसाय २२ शहर आणि ४ देशांमध्ये पसरला आहे. २०१६ पासून सौरभ लुथराला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. सौरभ लुथरासह जनरल मॅनेजर विवेक सिंहला अटक करण्यात आलीय. धक्कादायक बाब म्हणजे क्लब पाडण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली होती. पण पंचायतीच्या संचालकांनी त्यास स्थगिती दिली होती. आता आगीच्या दुर्घटनेनंतर यावरही उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.