Traditional decoration for Ganesh Chaturthi in goa Dainik Gomantak
ब्लॉग

Ganesh Festival: गोव्यात बाप्पांच्या सजावटीसाठी पारंपारिक पद्धतीची 'माटोळी'

उत्तर गोव्यातील सत्तरी या गावांमध्ये काही कुटुंबे 400 पेक्षा जास्त वस्तूंनी माटोळी सजवतात.

दैनिक गोमन्तक

पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश चतुर्थी सण साजरा करण्यासाठी भारतभर जनजागृती करण्यात येत आहे. आणि त्यासाठी लोकांचा प्रतिसाद पण तितका मिळत आहे. गणेश चतुर्थी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. गोव्यामध्ये गणेश चतुर्थीला अनन्यसाधारण महत्व आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गृहिणींची लगबग चालू झाली आहे. महिला वर्ग गेणेश चतुर्थीच्या तयारीमध्ये मग्न झालेला आहे. अनेक परंपरा लाभलेल्या गोव्यामध्ये माटोळी या पारंपारिक सजावटीला सुध्दा खुप महत्वाचे स्थान आहे.

गोव्यात सध्या पर्यावरणपूरक मूर्तीची मागणी वाढत आहे. ग्रामीण गोव्यात तर गणेश चतुर्थी नेहमीच पर्यावरणास अनुकूल असते. याठिकाणी गणेश चतुर्थीच्या सजावटीमध्ये महागडे साहित्य, भपकेपणा, महागड्या लाइटिंग, थर्माकोल या सगळ्या गोष्टींचा वापर तुलनेने कमी असतो. गोव्यामध्ये पारंपरिक आरास करण्याकडे लोकांचा जास्त कल आहे. पारंपरिक आरास म्हणजेच माटोळी. यामध्ये विविध प्रकारची फळे, भाज्या आणि औषधी वनस्पतींनी सजवलेली इत्यादी वस्तुंनी लाकडी छत सजवली जाते. निसर्ग त्याच्या खऱ्या स्वरूपात कसा असतो हे यामधून दर्शविले जाते. खऱ्या अर्थाने पर्यावरण पूरक गणेश चतुर्थी गोव्यामध्ये साजरी केली जाते. हे दृश्य तुम्हाला गणपतीच्या काळात गोव्यातील अनेक गावांमध्ये बघायला मिळेल. गणेश मूर्तीच्या वर असलेल्या लाकडी छताला विविध फळे, भाज्या, पाने, कोंब, औषधी वनस्पती आणि कंदांनी झाकलेले असते. माटोळी हा पश्चिम राज्यातील गणेश चतुर्थी उत्सवाचा अविभाज्य भाग आहे.

माटोळी विषयी गोव्यातील कथा.

या उत्सवातील प्रत्येक घटक निसर्गाशी थेट संबंधित आहे, या ठीकाणी स्थानिक नदीपासून, मातीपासून गणेशाच्या आई -वडिलांची पूजा केली जाते. जंगली पाने आणि फुलांचे गठ्ठे हे गौरीचे प्रतिनिधित्व करतात तर महादेवाचे प्रतीक म्हणून नारळाचा वापर केला जातो. आणि या सर्व गोष्टींपुढे सर्वात महत्वाचा घटक म्हणजे माटोली. खरं तर, ही माटोळी ठेवल्यानंतरच मूर्तीची पूजेसाठी स्थापना केली जाते. औषधी वनस्पतींचा गठ्ठा पानांमध्ये गुंडाळलेला म्हणजेच माटोळी. "माटोळी हे जैवविविधतेचे एक उत्कृष्ट प्रदर्शन आहे, जे स्थानिक वनस्पतींचे पारंपारिक ज्ञान एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवते आणि जैवविविधतेबद्दल प्रेम आणि आदर विकसित करते," असे पर्यावरणवादी माटोळी सजवण्यासाठी वापरण्यात येणारी फळे आणि भाज्या खाण्यायोग्य, औषधी आणि विषारी अशा तीन प्रकारात विभागले जातात.

माटोळीमध्ये औषधी वनस्पतींचा वापर

आधुनिक औषधाच्या आगमनापूर्वी, गावकरी आजारांपासून बरे होण्यासाठी पूर्ण पणे नैसर्गिक पदार्थांवर अवलंबून होते, म्हणूनच त्यांच्यासाठी वन्य वनस्पतींचे ज्ञान असणे आवश्यक होते. माटोळीमध्ये सर्व औषधांचा समावेश होत असतो. गणेश चतुर्थीच्या काही दिवस आधी, स्थानिक पातळीवरील गावकरी, तरुण आणि वृद्ध लोक जंगलात जाऊन विविध जंगली फुले, फळे आणि पाने गोळा करतात जसे की कांगला, मट्टी (टर्मिनलिया एलिप्टिका), फागला (मोमोर्डिका डायका), केवण आणि त्रिफळा. यापैकी अनेक वनस्पतींचे सामाजिक-सांस्कृतिक महत्त्व मजबूत आहे. माटोळी विक्रीसाठी येणाऱ्या वस्तूंच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नाही. दक्षिण गोव्यातील कॅनाकोना, क्वीपेम आणि उत्तर गोव्यातील सत्तरी या गावांमध्ये काही कुटुंबे 400 पेक्षा जास्त वस्तूंनी माटोळी सजवतात.

गोव्यामध्ये माटोळी सजावटीसाठी किमान 350-400 वस्तू आहेत. सणापूर्वी सुमारे 15 दिवस आधी या वस्तू गोळा करण्यास सुरुवात होती. काही जंगली झाडे आहेत, जी एकेकाळी गुरांसाठी औषध म्हणून वापरली जात होती. परंतु आता ते माटोळीचा एक भाग आहेत." कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे वार्षिक माटोळी स्पर्धा आयोजित होत असतात. मूर्ती सजवण्यासाठी वापरली जाणारी जंगली पाने स्थानिक पातळीवर पितृ म्हणून ओळखली जातात. त्यापैकी बहुतेक सणाच्या एक दिवस आधी बाजारात सहज उपलब्ध असतात. पणजीपासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेला बणेस्तारी बाजार सर्वात प्रसिद्ध आहे. पण काही कुटुंबे, ते स्वतः गोळा करतात.

या कोरोनाच्या संकटामुळे गणेश चतुर्थीचा उत्साह कुठं तरी कमी होताना दिसून येत आहे. कोरोनाच्या संकटामुळे देशात सगळीकडे लॉकडाऊन असुन, याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. महागाई वाढली असून उत्पादनातील विविधता सुद्धा कमी जाणवत आहे. याचमुळे लोकांना खर्च करणे परवडणारे नाही. तरीही गोव्यामध्ये गणेश चतुर्थी अतिशय सध्या पद्धतीने पण तितक्याच उत्साहात साजरी केली जाते.गणेश चतुर्थी मध्ये गोव्यात मोठ्या प्रमाणात देखावे साजरे केले जातात. या देखाव्यातून काहीवेळा सामाजिक संदेश दिला जातो तर काही देखावे हे केवळ मनोरंजनासाठी असतात. देखाव्याच्या बाबतीत मार्शेल हे गाव अव्वल स्थानी आहे. दर वर्षी इथले देखावे बघण्या सारखे असतात. सामाजिक देखाव्या सोबतच घरगुती सजवटीचीही स्पर्धा याठिकाणी घेण्यात येते. गोव्यामध्ये मडगावला गणेशोत्सवात महत्वाचे स्थान आहे कारण या गावाला 21 दिवसांच्या बाप्पांची परंपरा लाभली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT