Goa Festival: गोव्यातील उत्सवाला पारंपारिक पदार्थांची जोड

गोव्यात प्रत्येक घरात गणेशोत्सव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जातो.
पुरणाचे मोदक
पुरणाचे मोदक Dainik Gomantak
Published on
Updated on

श्रावण महिना संपत आला की गणेशोत्सवाची चाहूल लागते. गोव्यातील (Goa) सर्वात महत्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव. गोव्यात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्व असून; येथील प्रथा, परंपरा या सणाची शोभा अधिकच वाढवतात. कोकणाबरोबरच गोव्यात प्रत्येक घरात गणेशोत्सव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जातो. गोव्यात गणेशोत्सवाला (Ganesh festival) धार्मिक (Religious) महत्व लाभले आहे. आपल्या बाप्पांच्या उत्सवासाठी नैवेद्याची तयारीसुद्धा मोठ्या उत्साहाने केली जाते. चला तर मग जाणून घेवूया गोव्यातील (Goa) पारंपारिक पदार्थांबद्दल.

पुरणाचे मोदक

साहित्य: (पारीसाठी)

* 150 ग्रॅम गव्हाचे पीठ

* 1 टेबलस्पून मीठ

* 1 टेबलस्पून तेल

आवश्यकतेनुसार पाणी

पुरणाच्या सारणासाठी

* हरभरा डाळ- 100 ग्रॅम

* गूळ - 50 ग्रॅम

* वेलदोडे - 3

कृती

मोदकाची पारी करण्यासाठी गव्हाचे पीठ, मीठ व तेलाचे मोहन घालून थोडे पाणी घालून घट्ट कणिक मळून घ्यावी. प्रथम पुरणाचे सारण करण्यासाठी हरबरा डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यावी आणि डाळ, गूळ व वेलदोडे घालून डाळ व गूळ छान शिजवुन घ्यावी व थोडे गार झाल्यावर पुरण वाटून घ्यावे. मोदक करण्यासाठी कणकेचा एक गोळा घेऊन पोळी लाटून त्याला छोट्या गोल आकारात कापून घ्यावे. नंतर त्यात पुरणाचा थोडं सारण भरून घेवुन मोदकाचा आकार देऊन मोदक तयार करून घ्यावेत. तयार मोदक एका स्टीमर मध्ये चाळणीवर ठेवून दहा ते बारा मिनिटे वाफवून घ्यावे. गरम मोदकांवर वरून तूप घालून बाप्पाला नैवेद्य दाखवावा.

पुरणाचे मोदक
Restaurants in Goa: गोमंतकीय चव जपणारे कोकणी कँटीन

* तांदळाच्या शेवयाची खीर

साहित्य

* पांढरे स्वच्छ तांदूळ - दोन वाट्या

* नारळ - एक

* दूध - अर्धा लिटर

* साखर किंवा ‍गूळ - चवीनुसार

* वेलदोडे - दोन पाकळ्या

कृती

तांदूळ स्वच्छ धुऊन ते फडक्यावर वाळवावेत. त्यानंतर तांदूळ बारीक करून बारीक चाळणीने चाळून घ्यावे. या पिठात आवश्यकतेनुसार पाणी घालून एका भांड्यात उकळावे. चवीसाठी मीठ व दोन चमचे तूप घालावे. उकळी आल्यानंतर त्यात पीठ घालावे. नंतर याचे मिश्रण चांगले मिक्स करून मंद आचेवर ठेवावे. नंतर पातेले खाली घेऊन उकड गरम असतानाच एखादे भांडे घेऊन मळावी. उकड मळून झाल्यावर त्याचे मुटके करावेत. ते मुटके मोदकपात्रात ठेवून वाफ येऊ द्यावी. चांगली वाफ आल्यावर एक एक मुटका शेवपात्रात घालून त्याचा शेव पाडाव्यात. नारळ खीसून त्याचे दूध काढावे. अर्धा लिटर दूध घेऊन त्यात नारळाचे दूध घालावे. नंतर साखर किंवा गूळ मिक्स करावे. त्यावर चवीसाठी वेलदोड्यांची पूड घालावी. शेवयांवर दूध घालून खाल्ल्याने याची चव अधिक वाढते.

* मणगणे रेसीपी (चणा डाळीची खीर)

साहित्य

* ओल्या नारळाचा खीस 1/2 वाटी सोबत थोडे तुकडे घ्यावेत,

* हरभरा डाळ - 1/2 वाटी,

* तांदूळ - 1 वाटी

* खसखस -1 चमचा

* काजूचे तुकडे - आवडी नुसार

* गुळ - 1 वाटी

* वेलची पावडर - आवडी नुसार

कृती

* हरभरा डाळ आणि तांदुळ स्वच्छ धुवून घ्यावेत

* हरभरा डाळ दहा मिनिट भिजत ठेवावी.

* तांदूळ धुवून घ्यावेत.

* दोन्ही एकत्र करुन जाड बुडाच्या पातेल्यात शिजत ठेवावे.

* शिजल्यानंतर त्यात गूळ, खोबरे, खसखस, काजूचे तुकडे घालावेत.

* 1/2 चमचा साजूक तूप घालावे.

* वेलची पूड घालावी.

हा पदार्थ करायला सोपा असून गणेश चतुर्थी आणि नारळी पौर्णिमेला बनवला जातो.

पुरणाचे मोदक
Restaurants in Goa: 'जिला बेकरी'; बेकरी उत्पादन निर्मीतीतले महत्वाचे नाव

मुगाच्या गाठी

साहित्य

* मोड आलेले मूग - 1 वाटी

* ओलं खोबरं - अर्धी वाटी

* सुक्या मिरच्या - चवीनुसार

* धणे - 1 छोटा चमचा

* मिरी - 2/4 दाणे

* चिंचेचा कोळ

* हळद - मीठ

* गूळ - आवडीनुसार

* तेल - 2 चमचे

* काजू - आवडीनुसार.

कृती

मूग आणि काजू शिजवून घ्यावे. नंतर शिजवताना त्यात हळद घाला. कुकरची1 शिटी करून घ्यावी. नंतर कढईत सुक्या मिरच्या किंचित लाल करून घ्या. (सुक्या भाज्या) यात मिरच्या, हळद, चिंच कोळ, धणे, मिरी, ओलं खोबरं, सर्व वाटुन घ्यावे. शिजलेल्या मुगात हे वाटण घालून आवश्यकतेनुसार पातळ करून घ्या. चवीप्रमाणे गूळ आणि मीठ घालुन उकळून घ्या. तेल किंवा तूप गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घालून खमंग फोडणी द्यावी.

टीप: काजू नको असल्यास खोबऱ्याचे काप घालू शकता. चिंच नसल्यास तुम्ही कोकम वापरू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com