Ganesh Chaturthi: 'गणेश चतुर्थी राज्य महोत्सव जाहीर करा'! आमदार साळकरांची मागणी; अध्यात्मिक पर्यटनांतर्गत आणण्याचा प्रस्ताव

Ganesh Chaturthi state festival: अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना ते म्हणाले, गणेशोत्सवात जी झाडे आणि फळांचा इतरवेळी वापर होत नाही त्यांचा वापर माटोळीत केला जातो.
Daji Salkar Ganesh Chaturthi
Daji Salkar Ganesh ChaturthiDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गणेश चतुर्थीला राज्य महोत्सव म्हणून जाहीर करावा. चतुर्थी संपली की ती पुन्हा कधी येणार, याची सर्वजण वाट पाहतात. गणेश चतुर्थी ही गोव्यात सर्व घरोघरी साजरी केली जाते, त्यात सर्वांचा सहभाग असतो. अध्यात्मिक पर्यटन करीत आहोत, त्याअंतर्गत हा महोत्सव आणावा, अशी मागणी आमदार दाजी साळकर यांनी केली.

अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना ते म्हणाले, गणेशोत्सवात जी झाडे आणि फळांचा इतरवेळी वापर होत नाही त्यांचा वापर माटोळीत केला जातो. या महोत्सवाची सर्वांना एवढी आवड असताना त्याला राज्य महोत्सवाचा दर्जा का मिळू नये?

Daji Salkar Ganesh Chaturthi
Ganesh Chaturthi: 'बाप्पा वाचव रे'! म्हापशात मूर्तिकारांपुढे महागाईसह अडचणींचे विघ्न; चिकणमाती, रंगाचे भाव गगनाला भिडले

साळकर म्हणाले, भूखंड बळकाव प्रकरणी एसआयटी स्थापन करून अनेकांवर तक्रारी झाल्या. त्यामळे जमीन लुटण्याचे प्रकार थांबले आहेत, त्यामुळे पोलिस खात्याचे काम चांगले झाले आहे, असे म्हणावे लागेल.

Daji Salkar Ganesh Chaturthi
Ganesh Idol: स्वतः 'गणेशमूर्ती' तयार करण्याचा आनंद वेगळाच! शिल्पकलेची कार्यशाळा

राज्यात अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण १२ टक्के कमी झाले आहे. महिलांवरील अत्याचारासाठी पोलिस स्वतःहून तक्रारी करण्यासाठी पुढाकार घेत आहेत, ही बाब चांगली आहे. मात्र, सायबर क्राईम गुन्हे वाढले आहेत, त्याला आळा घालण्यासाठी प्रयत्न व्हावेत. आयआरबी विभागास पोलिसांत विलीन करून घ्यावे. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी फक्त आयआरबीचा वापर होतो, त्यांचे विलिनीकरण झाल्यास पोलिसांची कमतरता आहे, ती भरून निघेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com