Costume Dainik Gomantak
ब्लॉग

Univers Teen India 2023: वेशभूषा रचनेमागे विचार असतो

‘पेन हे तलवारीपेक्षा शक्तिशाली आहे’ हे या वेशभूषेचे उपशीर्षक होते.

गोमन्तक डिजिटल टीम

मेल्वीन नोरोन्हा

भारतीय साहित्य आणि समानतेचा योध्दा’ या थिमअंतर्गत, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या सन्मानार्थ त्याने ही वेशभूषा बनवली होती. ‘पेन हे तलवारीपेक्षा शक्तिशाली आहे’ हे या वेशभूषेचे उपशीर्षक होते.

गुरुदेव टागोरांना समर्पित असलेल्या या विषयाबद्दल अधिक सांगताना मेल्विन म्हणाला, ‘स्त्रियांचा आवाज ज्या काळात दडपला जात होता, त्या काळात स्त्रीमुक्तीसाठी लिहिण्याचे काम त्यांच्या लेखणीने केले.

या वेशभूषेचा भाग म्हणून एक वैशिष्ट्यपूर्ण ढाल संजनाच्या हातात दिसते, ज्यावर गुरुदेव टागोरांचा चेहरा कोरलेला आहे. स्त्रियांना संरक्षण देणाऱ्या कार्याचे प्रतिनिधित्व ती ढाल करते. तिच्या दुसऱ्या हातात असलेल्या समानतेच्या तलवारीच्या मुठीवर पुरुषांच्या मिशांचा आकार आहे.

ही तलवार तिचे संरक्षण करायला समर्थ आहे. मुक्त वाहणारे स्त्रीचे केस आणि तिच्या शरीराभोवतीचे प्रभामंडल, स्त्री म्हणून झालेली तिची सामर्थ्यशाली उत्क्रांती दर्शवते. मेल्विन म्हणतो, ‘रवींद्रनाथाच्या साहित्यात स्त्रियांचे स्थान फार वरचे आहे.

त्यांच्या अनेक नाटकांच्या मुख्य व्यक्तिरेखा स्त्रियाच आहेत. स्त्री-हक्क आणि स्त्री-वाद यासाठी पुरुषांनीदेखील पुढे सरसावले पाहिजे. केवळ एकट्या स्त्रीने लढून ते साध्य होऊ शकणार नाही हेच मला सांगायचे होते.’

आपल्या संकल्पनेविषयी अधिक सांगताना मेल्विन म्हणतो, ‘जी स्त्री ही वेषभूषा परिधान करणार होती तिच्या व्यक्तित्वाचा विचार करूनच मी या वेशभूषेची रचना केली आहे.

संजना, दिल्लीच्या ‘टागोर इंटरनॅशनल स्कूल’ची विद्यार्थिनी आहे. वाचन, चर्चा, परिसंवाद या गोष्टी तिला आवडतात. अभ्यासात ती टॉपर आहे. जेव्हा मी हा विषय सुचवला तेव्हा तिला तो खूप आवडला व तिला रडूच फुटले.’

मेल्विन म्हणतो, आपल्या मॉडेलबद्दल आपल्याला ठाऊक असणे महत्त्वाचे असते. मी जेव्हा अशी कामे स्वीकारतो, तेव्हा त्यांना मी 90 प्रश्‍न पाठवतो. त्यातून मला त्यांच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी कळतात.

त्यांचे व्यक्तिमत्त्व कळून येण्यासाठी मी खूप प्रयत्न करतो आणि त्यानंतर, त्याच्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल अशी वस्त्ररचना तयार करतो.

मी वेशभूषेपेक्षा व्यक्तीवर अधिक लक्ष केंद्रित करतो. वेशभूषा ही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा विस्तार करणारी असावी. व्यक्तिमत्त्वाला शोभणारी वेशभूषा मॉडेलकडून आत्मविश्‍वासाने परिधान केली जाते.

मेल्विन हा खरे तर आयटी इंजिनियर. पण त्याने आधीच ठरवले हाेते की इंजिनियरिंगची पदवी घेतल्यानंतर, एक वर्ष कुठलीही नोकरी न स्वीकारता तो आपल्या कलागुणांवर काम करेल.

त्याप्रमाणे 2010 मध्ये झालेल्या ‘व्हॉईज ऑफ गोवा’ मध्ये तो सहभागी झाला व त्याने ती स्पर्धा जिंकलीदेखील.

अशा कार्यक्रमात भाग घेण्यासाठी स्वतःचे पोशाख तो स्वतःच डिझाईन करत असे. अशाप्रकारे तो स्वतःच एक ‘स्टाईल स्टेटमेंट’ ठरू लागला. त्याच्याकडे कपड्यांचा एक छान सेन्स होता.

त्यानंतर तो ‘रॉयल कॉलेज ऑफ म्युझिक, लंडन’च्या ऑपेरामध्ये गायला लागला.  ‘गोदरेज क्रॉस द कन्ट्री’मध्ये त्याची निवड होऊन वेगवेगळ्या ठिकाणी होणार्या त्यांच्या कार्यक्रमांमध्ये तो भाग घेऊ लागला.

त्यावेळी अनेकांच्या लक्षात येऊ लागले की गाण्याबरोबरच हा फॅशनमध्येही काम करतो. त्याला फॅशन शो मध्ये निमंत्रण मिळायला सुरुवात झाली. फॅशन शोमध्येही तो गायचा.

एकदा एका फॅशन शोमध्ये शोची कोरियोग्राफर आजारी पडली त्यावेळी या पठ्ठयाने मॉडेल मंडळींच्या सांगण्यावरुन त्या कार्यक्रमाची कोरिओग्राफी केली.

गोव्यात होणाऱ्या अनेक फॅशन शोमध्ये अर्धे मॉडेल गोव्याचे असायचे. गोव्याचे मॉडेल प्रशिक्षित नसल्याने कार्यक्रमाचा दर्जा मग उतरायचा. मेल्विन मग गोमंतकीय मॉडेलना, शोच्या तीन तास आधी मोफत ट्रेनिंग दयायला लागला.

त्याचे काम पाहून गोव्यातल्या एका मुलीने त्याला आपल्याला ट्रेनिंग देण्यासाठी विनंती केली. ती मुलगी- गेल डा सिल्वा,  पुढे 2014 या वर्षी 'फेमीना मिस युनायटेड कॉन्टिनेंट' बनली. फेमीना मिस इंडीया स्पर्धेत यश मिळवणारी एकमेव गोमंतकीय होती. अशातऱ्हेने मेल्विनचा प्रवास सुरू झाला.

मेल्विनने भारतामधील मॉडेलबरोबरच परदेशी मॉडेलबरोबर काम करून, त्यांनाही पुरस्कार मिळवून दिले आहेत. आतापर्यंत सुमारे 30 देशांत त्याने काम केले आहे.

त्यामुळे सौंदर्यस्पर्धेत यश मिळवण्यासाठी स्पर्धकांनी कशाप्रकारची वेशभूषा करणे आवश्यक आहे किंवा अनेकवेळा आपल्या मॉडेल कमी कुठे पडतात याची कल्पना त्याला आहे.

ज्याप्रकारे संजना सक्सेना हिला मेल्विनने वेशभूषा प्रदान केली आहे त्यामागचा विचार पाहता व त्या वेशभूषेची भव्यता पाहता मेल्विनच्या त्या कौशल्याची साक्ष मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT