Crime News : जानेवारी, फेब्रुवारीत आठ अल्पवयीन मुलींचे अपहरण

दक्षिण गोव्यातील घटना : बहुतांश प्रकरणांत परिचित असलेल्यांचा अथवा शेजाऱ्यांचाच गुन्ह्यात हात
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव : दक्षिण गोव्यात सध्या अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची प्रकरणे वाढली असून जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यांतच आठ मुलींचे अपहरण झाले असून ही चिंतेची बाब समजली जात आहे. यातील बऱ्याच प्रकरणात ओळखीच्या किंवा शेजारी राहणाऱ्यांचाच अशा गुन्ह्यात हात असल्याचे दिसून आले आहे.

सध्या मायणा कुडतरी व कुंकळ्‍ळी पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीत अशा प्रकारची प्रत्‍येकी एक घटना घडली असून त्यामुळे अपहरणाचा हा मुद्दा पुनः चर्चेत आला आहे.

यातील मायणा कुडतरी पोलिस ठाण्‍यात नोंद प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावताना गणेश गौडा या संशयिताला अटक करून त्‍या मुलीची सुटका केली. तर कुंकळ्‍ळी पोलिस ठाण्‍यात नोंद अपहरण प्रकरणी सध्‍या पोलिस शोध घेत आहेत. चालू वर्षाच्‍या जानेवारी ते फेब्रुवारी या पहिल्‍या दोन महिन्‍यांत दक्षिण गोवा जिल्‍ह्यांतील विविध पोलिस ठाण्‍यात अपहरणाच्‍या एकूण आठ घटना घडल्‍या असून, त्‍यातील सहा प्रकरणांचा पोलिसांनी तपास लावला आहे.

Crime News
Vasco Crime: बोगमाळोत एकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या? घातपाताचा संशय

पैशांच्‍या प्रकरणातून मागच्‍या खेपेला तसेच यावर्षीही एकाही अपहरण प्रकरणाची पोलिस दफ्‍तरी नाेंद नाही. मागच्‍या वर्षी ज्‍या अपहरणाची प्रकरणे घडली. त्‍यातील पीडीतामध्‍ये परप्रांतीय ७७ टक्‍के आहेत तर गोवेकर २२ टक्‍के आहेत. संशयितांमध्‍ये ८५ टक्‍के परप्रांतीय झोपडपट्टी परिसरातील तर १४ टक्‍के गोमंतकीय आहेत.

२०२२ साली या जिल्‍ह्यात अपहरणाच्‍या एकूण ३० घटना नोंद झाल्‍या होत्‍या. त्‍यातील २७ प्रकरणांचा पोलिसांनी छडा लावला होता. यातील बहुतांश अपहरणे ही ओळखीच्‍या व्‍यक्‍तींकडून झालेली आहेत. ८५ टक्‍के प्रकरणे ही प्रेमप्रकरणे आहेत, ज्यात मुलगा किंवा मुलगी अल्‍पवयीन होती. संबंधितांच्‍या पालकांनी तक्रार दिल्‍यानंतर पोलिसांनी ही प्रकरणे नोंदवून घेऊन त्‍याचा तपास सुरू केला.

- अभिषेक धनिया,दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक

Crime News
UP Crime News: बायकोचा खून करून नवरा झोपला मृतदेहाजवळ, उत्तर प्रदेशमधील घटननेने खळबळ

अल्‍पवयीन युवतींच्या अपहरणाच्‍या घटनांत वाढ ही गोव्यासाठी खूपच बाब चिंतेची आहे, अशा प्रकरणांचा तपास लावून संशयितांना अटक करावी. राज्यात विविध झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात अपहरणासारख्या गुन्ह्याच्या घटना घडत असल्‍याचेही तपासात आढळले आहे.

-राजू विर्डीकर,शिवसेनेचे शाखा विस्‍तार प्रमुख

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Monsoon
Mokhard Sisters Death Case
GIM Hostel Knife Attack Latest News
Goa Crime Rate Increase
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com