दामोदर मावजो Gomantak Digital Team
ब्लॉग

‘व्हॅली ऑफ वर्डस्’ पुरस्कारसाठी ‘द वेट’ला नामांकन

'व्हॅली ऑफ वर्डस्’ हा त्याच नावाच्या फाऊंडेशन ट्रस्टमार्फत चालवला जाणारा ‘ना नफा’ उपक्रम आहे. जो भारतीय साहित्य आणि कलात्मकतेचा गौरव बिंदू बनला आहे.

सुशांत कुंकळयेकर

प्रतिष्ठेच्या ‘व्हॅली ऑफ वर्डस्’ पुरस्कारसाठी पुस्तकांच्या नामांकनाची घोषणा झाली असून त्यापैकी भारतीय भाषेमधील पुस्तकांच्या इंग्रजी अनुवादासाठी असलेल्या पुरस्कारासाठीच्या नामांकनाच्या यादीत ज्ञानपिठकार भाई (दामोदर) मावजो यांच्या ‘द वेट’ या गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे. या विभागामध्ये एकूण ९ पुस्तकांना नामांकन लाभले आहे.

‘द वेट’ या मावजो यांच्या पुस्तकाबरोबरच ‘द ब्लॅक माजिक वूमन (मौशमी कांडाली), द ब्राईड (हरीमोहन झा), इफ देअर इज अ गॉड (प्रभा श्रीदेवन) कालिंदी (श्रीधर केतकर), द ड्रीम ऑफ अ मॅपल गर्ल (डी.एम.झुआरा), बिलोव्हड रोंगोमाला (शहीन अख्तर), टिअर्स ऑफ बेगमस् (ख्वाजा हसन निझामी), व्हॉट द रेनस फोरटोल्ड (एन. मोहनन) या पुस्तकाचा समावेश आहे. 

डेहराडून येथील ‘व्हॅली ऑफ वर्डस्’ आदल्या वर्षीच्या कॅलेडर वर्षात प्रकाशित झालेल्या पुस्तकांना आठ वेगवेगळ्या विभागांत पुरस्कार देते. इंग्रजीत भाषांतरित झालेली देशी भाषेतील पुस्तके हा त्यापैकी एक विभाग आहे.

हिंदी फिक्शन आणि नॉन फिक्शन, भारतीय भाषांमधून झालेली भाषांतरे, इंग्रजी फिक्शन आणि नॉन फिक्शन, युवकांसाठी लिहिले गेलेले साहित्य तसेच बालसाहित्य हे पुस्तक पुरस्कारांसाठीचे विभाग असतात.'व्हॅली ऑफ वर्डस्’ हा त्याच नावाच्या फाऊंडेशन ट्रस्टमार्फत चालवला जाणारा ‘ना नफा’ उपक्रम आहे. जो भारतीय साहित्य आणि कलात्मकतेचा गौरव बिंदू बनला आहे.

यंदा त्यांच्या पुरस्कारांचे हे सातवे वर्ष आहे. राष्ट्रीय स्तरावर त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या पुरस्काराबरोबरच ते आयोजित करत असलेला वार्षिक साहित्य आणि कलामहोत्सव लेखक, समीक्षक, अभ्यासक, वाचक कलाकार आणि श्रोत्यांना एकत्रित आणतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT