Painting of the Week Dainik Gomantak
ब्लॉग

पेंटिंग ऑफ द वीक

इतिहासाच्या पानात नमूद केले आहे की सावई-वेरे ही आध्यात्मिक आणि धर्मनिरपेक्ष शिकवणीसाठी प्रसिद्ध असलेली भूमी आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Painting of the Week सावई-वेरे या गावापासून किंचित कडेला असलेले श्री अनंत मंदिर, हिरवागार ऐसपैस आपल्याभोवती घेऊन वसलेले आहे. इतिहासाच्या पानात नमूद केले आहे की सावई-वेरे ही आध्यात्मिक आणि धर्मनिरपेक्ष शिकवणीसाठी प्रसिद्ध असलेली भूमी आहे.

अकराव्या शतकात इथली जमीन कदंब काळातल्या प्रारंभीच्या शासकांपैकी असलेल्या शास्तदेवाच्या गुरू आणि मार्गदर्शकांना त्यांच्या ज्ञानाच्या आदरादाखल भेट म्हणून देण्यात आली.

या देवळात सुमारे 1000 वर्षे विष्णूची पूजा केली जात असल्याचा दाखला आहे. या गावात सापडणाऱ्या प्राचीन प्रतिमाही विष्णूशी संबंधित आहेत

‘वॉटर कलर आर्टिस्ट असोसिएशन ऑफ गोवा’च्या 8 चित्रकार सदस्यांनी गेल्या रविवारी ह्या देवळापाशी त्यांच्या बाह्यस्थळ चित्रकला सत्राचे आयोजन केले होते.

त्यापैकी प्रसाद नाईक हे चित्रकार खुद्द सावई- वेरे या गावचे रहिवासी आहेत. त्यांनी रंगवलेले अनंत मंदिर या आठवड्याचे पेंटिंग ऑफ द वीक ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT