पुरुमेंत एक नॉस्ताल्जिया

कधीकाळी पणजी, मडगाव शहरातच प्रामुख्याने भरणारा पुरुमेंताचा बाजार आता उपनगरात आणि वेगवेगळ्या गावांतदेखील भरवला जातो.
Market
MarketDainik Gomantak
Published on
Updated on

चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी ‘पुरूमेंत’ या शब्दाला गोव्यातील लोकांच्या जीवनात जो अर्थ होता, तो कदाचित आजच्या काळात राहिला नसेल.

‘युज अँड थ्रो’च्या या जमान्यात, वर्षाचे 365 दिवस बाजाराला शरण जाणाऱ्या आपल्या दैनंदिन आयुष्यात ‘पुरूमेंत’ (बेगमी) या शब्दाला फारशी किंमत राहिलेली नसली, तरी वर्षानुवर्षे हळद कुंकू वाहून जागृत देवता बनलेल्या दगडासारखे ‘पुरूमेंत’ या शब्दाला आज भावनिक महात्म्य आलेले आहे.

पुरुमेंताच्या फेस्तात किंवा पुरुमेंताच्या बाजारात फिरताना, येणाऱ्या पावसाळ्यासाठी तिथल्या वस्तूंची बेगमी आपल्याला करून ठेवायची आहे अशी चिंतेची एकदेखील आठी कपाळावर नसते, तर बाजार रंगीबिरंगी करून टाकणाऱ्या त्या जिनसांची मनोभावे विचारपूस करून, वार्षिक सोहळ्याचा भाग म्हणून तिथल्या गर्दीत मिरवण्याचीच अनेकांना हौस असते.

Market
Theater: काणकोण नाट्य महोत्‍सव आजपासून

अर्थात अपवाद म्हणून, वर्षभरासाठी पुरेसा होईल इतका गरम मसाला कुटण्यासाठी लागणाऱ्या (बहुदा काणकोणी किंवा हरमल) मिरच्या अजूनही पुरुमेंताच्या बाजाराच्या ‘स्टार’ आकर्षण आहेत.

बाकी मातीची भांडी, गावठी कांदे, आमसुले, चिंच, मीठ, कडधान्ये, खारवलेले मासे इत्यादी जिन्नस गरजेनुसार वर्षभर बाजारात उपलब्ध असतातच, तरीसुद्धा गर्दीच्या आनंदाचा भाग बनून ते दरवर्षी पुरुमेंताच्या बाजारात हजर असतातच.

कधीकाळी पणजी, मडगाव या शहरातच प्रामुख्याने भरणारा पुरुमेंताचा बाजार आता शहरांच्या उपनगरात आणि वेगवेगळ्या गावांतदेखील भरवला जातो. त्यात हे दिवस फेस्ताचे असल्याने फेस्ताच्या प्रत्येक फेरीत पुरुमेंताची खूण सांगणारा एक तरी कोपरा असतोच.

आजच्या बोकाळलेल्या फ्लॅट संस्कृतीत, बेगमी करून ठेवण्याइतकी जागा घरात उपलब्ध नसली तरी ‘पुरूमेंत’ या शब्दाचा नॉस्ताल्जिया, आपल्याला त्या कोपऱ्याशी ओढत नेत तिथल्या जिनसांशी गुजगोष्टी करायला लावतोच.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com